प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

रिअलमीने आपल्या पुढील GT सीरिज फोनच्या लॉन्चिंगसाठी एक इवेंट शेड्युल केले आहे. त्यानुसार GT Neo 2T रोलआउट करणार आहे. मात्र हा फोनसह अन्य काही फोन आणि एक स्मार्टवॉच सुद्धा लॉन्च केले जाणार आहे. कंपनीने Realme Q3s फोन आणि Realme Watch T1 लॉन्च करणार आहे. Realme Q3s-Q सीरिजचा भाग होणार असून जो केवळ चीनमध्येच सेल केला जातो. मात्र याचे काही पोन दुसऱ्या बाजारात विविध नावाने आले आहेत. Realme Q3s चे लॉन्चिंग Realme ने Weibo वर शेअर केले होते त्याच्या पोस्टरच्या माध्यमातून समोर आले आहेत.

तर कंपनीकडून Realme Q3s ला 6.59 इंचाचा फुल HD+LTPS डिस्प्लेस 144HZ पर्यंत रिफ्रेश रेटसह येणार आहे. म्हणजेच पॉवर बटणावर फिंगरप्रिंट सेंसर येणार आहे. Realme Q3s मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरचा वापर केला जाऊ शकतो. फोनमध्ये पाठीच्या बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तसेच 64MP चा सेंसर, 2MP चा सेंसर आणि 2 MP चा सेंसर दिला जाणार आहे. Realme Q3s मध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच Android 11 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे.(Google कडून Login ID चोरणाऱ्या 'या' अॅपवर बंदी, लगेच बदला तुमच्या फेसबुकचा पासवर्ड)

Realme Watch 11 ची सुद्धा काही माहिती समोर आली आहे. स्मार्टवॉचमध्ये एक गोल डायल आणि एक रबरचा पट्टा आहे. Realme Watch T1 च्या इंटरफेसमध्ये गोल आयकॉन आहे. मात्र यामध्ये ऑपरेटिंग सिस्टिम कंपनीचा आहे. जर हे खरे असल्यास Google च्या Wear OS शिवाय Realme चे आणखी एक स्मार्टवॉच ठरेल. ज्याला नुकतेच तिसरे अपडेट मिळाले आहे. लीक झालेल्या रेंडर्सच्या मते, स्मार्टवॉच वॉइस कॉलिंगला सुद्धा सपोर्ट करणार आहे.