Realme C12 स्मार्टफोन खरेदी करण्याची आज संधी, जाणून घ्या फिचर्ससह ऑफर
Realme C12 (Photo Credits: Twitter)

Realme कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन Realme C12 स्मार्टफोनसाठी सेल आज दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे. हा फोन ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आणि Realme.com येथून युजर्सला खरेदी करता येणार आहे. तसेच 6000mAh ची बॅटरी आणि 4 कॅमेरे स्मार्टफोनसाठी देण्यात आले आहेत. फोनच्या रियर मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर रिअलमी कंपनीचा हा स्मार्टफोन खरेदी करण्याची आज तुम्हाला संधी मिळणारच आहे. तत्पूर्वी स्मार्टफोन संबंधित अधिक माहिती येथे जाणून घ्या.(Infinix Hot 10 स्मार्टफोनमध्ये युजर्सला मिळणार 5200mAh च्या बॅटरीसह 5 कॅमेरे, किंमत 10 हजारांपेक्षा कमी)

Realme C12 सिंगल स्टोरेज वेरियंट 3GB रॅम आणि 32GB सह येणार आहे. याची किंमत 8999 रुपये आहे. फोन पॉवर ब्लू आणि पॉवर सिल्वर रंगाच्या वेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. Flipkart Axis Bank च्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास ग्राहकांना 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक ऑफर दिला आहे. त्याचसोबत Axis Bank Buzz क्रेटिड कार्ड फोन खरेदी करण्यावर 10 टक्के सूट दिली जाते. या व्यतिरिक्त फोन 1000 रुपये मंथली EMI वर खरेदी करता येणार आहे.

स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा मिनी ड्रॉप एचडी+ डिस्प्ले दिला गेला आहे. जो 1600x720 पिक्सल स्क्रिन रेज्योल्यूशनसह येणार आहे. याचा अॅस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि 88:7 चा स्क्रिन टू बॉडी रेश्यो दिला आहे. फोनची स्क्रिन कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची दिली गेली आहे. सिक्युरिटीसाठी यामध्ये युजर्सला रियर फिंगरप्रिंट सेंसरची सुविधा मिळणार आहे. हा स्मार्टफोन 2.3Hz Octa Core MediaTek Helio G35 प्रोसेसरवर काम करणार आहे. युजर्सला याचा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डचा वापर करुन वाढवता येणार आहे.(Samsung Galaxy Tab A7 Launched: सॅमसंग ने भारतात लाँच केला ‘गॅलेक्सी टॅब ए7’; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स)

Realme C12 हा क्ंपनीचा बजेट रेंज स्मार्टफोन असून यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 13MP आहे. तर 2MP चा मोनोक्रोम सेंसर 2MP ची मॅक्रो लेंस दिली गेली आहे. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यामध्ये पॉवर बॅकअपसाठी 6,000mAh ची मेगा बॅटरी उपलब्ध आहे. जी शानदार बॅटरी बॅकअपसह येणार आहे.