Realme Buds 2 Neo इअरबड्स येत्या 1 जुलै रोजी लॉन्च होणार आहेत. लॉन्चिंग बद्दल GSMArena ने माहिती शेअर केली असून ते फ्लिपकार्टवर स्पॉट केले आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्टने आपल्या वेबसाइटवर Realme Buds Neo2 साठी एक प्रोमो पेज सेटअप केला होता. त्यानुसार अपकमिंग रिअलमी वायर्ड इअरफोन बद्दल काही माहिती समोर आली आहे. रिअलमी बड्स 2 निओ वायर्ड इअरफोन भारतात लॉन्च होण्यासह काही दुसरे प्रोडक्ट्स सुद्धा शोकेस करणार आहे. ज्यामध्ये हेअर ड्रायर आणि बिअर्ड ट्रिमरचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार असे ही समोर आले की, चीनी ब्रँन्ड आपले सबब्रँन्ड Dizo चे सर्व प्रोडक्ट्सची घोषणा करु शकते.
Realme Buds 2 Neo इअरफोन मध्ये गेल्या मॉडेल सारखेट 11/2mm ड्रायवर असणार आहे. तर जुन्या मॉडेलला Bass-Heavy लिस्टनर्ससाठी डिझाइन केले होते. लेटेस्ट बड्स 2 Neo वर्जन सुद्धा याच प्रकारचा अनुभव देऊ शकतात. डिझाइन बद्दल बोलायचे झाल्यास बड्स 2 निओ च्या geared shaped वायरिंगच्या सोबत पाहिले आहे. ज्यामध्ये 3/5 mm ऑडिओ जॅक 90 डिग्री अँगलवर येतात.(POCO F3 GT स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह संभाव्य फिचर्स)
बड्स 2 इअरफोनच्या विरुद्ध नव्या मॉडेलमध्ये वॉल्यूम बटण दिले नाही आहे. एक मायक्रोफोनसह एक इन-लाइट रिमोट कंट्रोल आहे. नव्या रिअलमी बड्स 2 निओ इअरफोन दोन कलर ऑप्शन-ब्लॅक आणि ब्लू रंगात येणार आहे. तर रिअमली बड्स 2 हे 599 रुपयांना लॉन्च केले होते. असे मानले जात आहे की, हे नवे वर्डन अधिक स्वस्त असू शकते.