Google Pay Tez Shots गेम खेळून जिंका 2000 रुपये; जाणून घ्या गेम खेळण्याची पद्धत
Google Pay (File Photo)

सध्या सुरु असलेल्या आईसीसी क्रिकेट वर्ल्डकपचा फिव्हर सर्वत्र आहे. क्रिकेटची जगभरात असलेली क्रेझ लक्षात घेऊनच गुगल पे अॅप Tez Shots हा नवा गेम सुरु केला आहे. गेम मध्ये तुम्ही मोबाईलमध्ये क्रिकेट खेळून पैसे कमावू शकता. हा गेम अॅनरॉईड फोन्सवर उपलब्ध आहे. मात्र हा गेम खेळण्यासाठी तुमच्याकडे गुगल पे चे 34.0.001_RC01 किंवा त्यावरील व्हर्जन असणे आवश्यक आहे. या लेटेस्ट व्हर्जनमध्ये तुम्हाला प्रमोशन्स सेक्शनमध्ये हा गेम मिळेल.

Google Pay Tez Shots गेम कसा खेळायचा?

प्रमोशन्स सेक्शनमध्ये प्ले नाऊ वर क्लिक करा. इंटरफेस ओपन होईल. त्यावर डाव्या बाजूला बेस्ट स्कोअर दिसेल तर उजव्या बाजूला सध्याचा स्कोर दिसेल. सर्वात खाली बॅट आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर बॅट स्विंग होईल. तर बॉलरने बॉलिंगला सुरुवात केल्यावर बॅट व्यवस्थित स्विंग होईल. त्या आधारे तुम्ही रन्स काढू शकता. चौकार, षटकार मारु शकता.

तुमचा टोटल स्कोअर 100 झाल्यावर तुम्हाला 50 रुपयांचे स्क्रॅच कार्ड मिळेल. त्याचबरोबर 500

धावा झाल्यावर 100 रुपयांचे स्क्रॅच कार्ड मिळेल. त्यानंतर 1,000, 2,000, 3,000 रन्सवर तुम्हाला अनुक्रमे 150, 1000 आणि 2000 रुपयांचे स्क्रॅच कार्ड मिळतील.

मात्र हे स्क्रॅच कार्ड्स मोबाईल रिचार्ज, बिल पेमेंट्स अशा स्वरुपात मिळतील. तर तुमच्याकडे अॅनरॉईड फोन असेल तर तुम्हाला पैसे कमवण्याची ही चांगली संधी आहे.