जुन्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून चोरी केला जाऊ शकतो तुमचा Personal Data, जाणून घ्या कसा कराल बचाव
iPhone | (Photo Credits: PixaBay)

सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर सर्वाधिक वाढत चालला आहे. नवंनव्या तंत्रज्ञानामुळे एका बाजूला आयुष्य सोपे होतेय तर दुसऱ्या बाजूला फ्रॉड आणि स्कॅमच्या घटना वाढतायत. अशातच तंत्रज्ञानाच्या जगात स्वत:चा खासगी डेटा आर्थिक फसवणूकीपासून सुरक्षित ठेवणे थोडे कठीणच होते. अशातच जाणून घ्या तुम्ही तुमचा जुन्या क्रमांकावरील खासगी डेटा कसा सुरक्षित कराल. तसेच जुना क्रमांक सोशल मीडिया ते बँकिंग डिटेल्स मध्ये आपण देतो. येथे जाणून घ्या तुमच्या जुन्या क्रमांकामुळे तुमच्या खासगी डेटाला कसा धोका उद्भवतो आणि त्यापासून तुम्ही कसा बचाव कराल.(Instagram वर Clubhouse सारखे फिचर, लाईव्ह दरम्यान व्हिडिओ-ऑडिओ करता येणार बंद)

तुम्हाला माहितीच असेल जसे तुम्ही एखादा नवा मोबाईल क्रमांक घेता तेव्हा जुना क्रमांक टेलिकॉम कंपन्या रिसायकल करुन तोच क्रमांक अन्य दुसर्या ग्राहकाला देतात. टेलिकॉम कंपन्या नंबर सीरिज वाढवण्यापासून रोखण्यास असे काम करते. अशातच तुमचा जर जुना मोबाईल क्रमांक एखाद्याला असाइन झाला तर त्या क्रमांकावरुन संबंधित डेटा एक्सेस करणे नव्या युजर्सला सोप्पे होते. यामुळेच तुमच्या प्रायव्हसी आणि सेफ्टीसाठी धोका उद्भवू शकतो.

अमेरिकेतील प्रिंसटन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या एका रिपोर्ट्सनुसार, तुमचा जुना क्रमांक रिसायकल केल्याची संपूर्ण प्रक्रियाच सिक्युरिटी आणि प्रायव्हसी संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थितीत करतात. नवा युजर त्या क्रमांच्या माध्यमातून जुन्या युजर्सची माहिती एक्सेस करु शकतो. तुम्ही नवा क्रमांक जर वापरत असल्यास तर जुना क्रमांक अपडेट करण्यास विसरु नका. नाहीतर तुमच्या सर्व डिजिटल खात्यासंबंधित ही माहिती चोरी होऊ शकते.(SIM Card: काय तुमच्या नावावर अन्य कुणी सिमकार्ड वापरत आहे? दोन मिनिटांत अशी मिळवा माहिती)

या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, कशा प्रकारे एका पत्रकाराने नवा क्रमांक घेतल्यानंतर त्याला ब्लड टेस्ट आणि स्पा ची अपॉइंटमेंट असल्याचे मेसेज येणे सुरु झाले. या रिसर्चमध्ये 200 रिसायकल क्रमांकाचा तपास एका आठवड्याभरातच करण्यात आला. त्यामधून असे समोर आले की, त्या क्रमांकावर जुन्या युजर्सचे कॉल आणि मेसेज येत होते. यामध्ये काही वेळेस ऑथेंटिकेशन मेसेज आणि ओटीपी सारखे मेसेज येण्यास सुरुवात झाली. शोधकर्त्यांनी यामुळे होणाऱ्या 8 धोक्यांचे लिस्ट तयार केली. ज्यामध्ये फिशिंग अटॅक ते विविध अलर्ट, वृत्तपत्र, अभियान आणि रोबोकॉलसाठी साइन अप करणे याचा समावेश आहे.