SIM Card: काय तुमच्या नावावर अन्य कुणी सिमकार्ड वापरत आहे? दोन मिनिटांत अशी मिळवा माहिती
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

इतरांच्या कागदपत्राचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे सिम कार्ड (SIM Card) घेतल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. याचा फटका अनेकांना बसला आहे. काहीजणांना चुकी नसतानाही पोलीस ठाण्याचे उंबरठे झिझवावे लागले आहे. यामुळे तुमच्या नावावर किती मोबाइल नंबर अॅक्टिव आहेत? हे जाणून घेणे अधिक गरजेचे आहे. यासाठी दूरसंचार विभाग (DoT) ने एक पोर्टल tafcop.dgtelecom.gov.in लाँच केले आहे. या पोर्टलच्या मदतीने आपल्या नावावर अन्य कोणी सिमकार्ड वापरतो का? हे तुम्हाला केवळ दोन मिनिटांत कळणार आहे.

दुसऱ्यांच्या कागदपत्रांचा वापर करून मोबाइल सिम कार्ड घेणे हे बेकायदेशीर आहे. मात्र, तरीही अशाप्रकारच्या अनके घटना वारंवार समोर येत आहेत. यावर रोख लावण्यासाठी दूरसंचार विभागाने एक टूल लाँच केले आहे. या ऑनलाइन टूलच्या मदतीने तुम्ही वापरत नसलेल्या नंबरपासून सुटका मिळवू शकतात. या वेबसाईटनुसार, तुमच्या नावावर कोण-कोण सिम कार्ड वापरत आहेत. तसेच किती मोबाइल नंबर्स सुरू आहेत. यासोबतच ते या नंबर्सला ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट टाकू शकतात, असे दूरसंचार विभागाचे उप संचालक जनरल ए रॉबर्ट रवी यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा-Vivo V21 5G स्मार्टफोन पुढील आठवड्यात भारतात लॉन्च होण्याची शक्यता, जाणून घ्या फिचर्सबद्दल अधिक

महत्वाचे म्हणजे, एका व्यक्तीला 9 मोबाइल कनेक्शन दिले जाऊ शकते. परंतु, असेही काही युजर्स आहेत, ज्यांच्या नावावर 9 पेक्षा अधिक मोबाईल कनेक्शन सुरु आहेत. हे पोर्टल आंध्र प्रदेश आणि तेलंगानाच्या लायसन्स असलेल्या सेवा क्षेत्रात आहे. याशिवाय, या सर्विसला अन्य फेज मध्ये लागू केले जाणार आहे.