Vivo V21 5G स्मार्टफोन पुढील आठवड्यात भारतात लॉन्च होण्याची शक्यता, जाणून घ्या फिचर्सबद्दल अधिक
Vivo Smartphone (Photo Credits: Vivo)

विवो कंपनीचा शानदार स्मार्टफोन Vivo V21 5G भारतात लॉन्चिंग करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार हा फोन येत्या 29 एप्रिलच्या दिवशी लॉन्च केला जाणार आहे. हे डिवाइस मायक्रोसाइट ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर लाइव्ह करण्यात आले आहे. मुख्य स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास युजर्सला विवो वी21 5G मध्ये 44MP चा सेल्फीचा कॅमेरा आणि वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले मिळणार आहे. या फोनसाठीचा इव्हेंट 29 एप्रिलला दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. हा इव्हेंट युजर्सला कंपनीच्या अधिकृत युट्युब चॅनल आणि फेसबुक पेजवर पाहता येणार आहे.

फ्लिपकार्टवरील लिस्टिंगनुसार, Vivo V21 5G स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 44MP सेल्फी कॅमेरा सोबत येणार आहे. हा स्मार्टफोनमध्ये युजर्सला वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले आणि 3GB रॅम मिळणार आहे. या फोनचे वजन 117 ग्रॅम असणार आहे. तसेच कंपनीच्या या स्मार्टफोनच्या किंमती बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु लीक्स झालेल्या रिपोर्ट्सनुसार, या आगामी डिवाइसची किंमत 30-40 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते. त्याचसोबत Arctic व्हाइट, Dusk ब्लू आणि Sunset Dazzle कलर ऑप्शनमध्ये बाजारात उतरवला जाऊ शकतो.(Sony चा मोबाईल फोनपेक्षा लहान AC लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

दरम्यान, विवो कंपनीने काही दिवसांपूर्वी Vivo X60 स्मार्टफोन लॉन्च केला होता. याची सुरुवाती किंमत 37,990 रुपये आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास विवो एक्स60 स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे. याचे रेज्यॉल्यूशन 1080X2376 पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सैंपलिंग रेट 240Hz आहे. तर पिक्सल डेंसिटी 398 pp आणि स्क्रिन टू बॉडी रेश्यो 92.7 टक्के आहे. यामध्ये फ्लेक्सिबल अल्ट्रा O स्क्रिन दिली गेली आहे. जो 3.96mm पंचहोल कटआउटसह येणार आहे. Vivo X60 स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 11 आधारित Funtouch OS 11.1 वर काम करणार आहे. फोन Qualcomm Snapdragon 870 SoC चिपसेट सपोर्टसह येणार आहे.