प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

टेक्नॉलॉजीच्या जगात भरपूर अशा काही गोष्टी आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवणे सुद्धा अशक्य आहे. अशातच आता सोनी कंपनीने त्यांचा घालून फिरता येईल असा एसी (AC) तयार करण्याच रेकॉर्ड केला आहे. कंपनीचा हा एसी साइजमध्ये स्मार्टफोन पेक्षा आकाराने लहान आहे. ज्यामुळे तो तुम्हाला कोठेही घेऊन जाता येणार आहे. सोनीच्या या एसीचे नाव Reon Pocket असे आहे. हा एक अॅप कंट्रोल वेअरेबल एअर कंडीशनर असून जो गेल्या वर्षात रिलिज करण्यात आला होता. रेऑन पॉकेट 3 ची जपान मध्ये किंमत 138 डॉलर्स (जवळजवळ 14,850 रुपये) आहे. दरम्यान भारतात नेकबॅंन्ड एसी केव्हा लॉन्च केला जाणार याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

The Verge च्या रिपोर्ट्सनुसार, Sony च्या या एसीबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, तो सिंगल चार्जमध्ये काही तासांसाठी वापरता येणार आहे. Reon Pocket 2 आपल्या वास्तविक मॉडेलच्या डिझाइन सारखाच आहे. मात्र नव्या डिझाइनच्या Sony वेअरेबल एसी परफॉर्मेन्समध्ये अत्यंत शानदार आहे. वेअरेबेल एसीच्या तुलनेत शरीरातून निघणारी हिट दुप्पट पटीने शोषून शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करणार आहे. अधिक पॉवरफुल कूलिंग परफॉर्मेन्ससह येणार आहे. Reon Pocket 2 मध्ये Sony कडून घाम शोषण्याची क्षमता अधिक मजबूत करण्यात आली आहे.(Oppo A53s 5G स्मार्टफोन 'या' दिवशी होणार भारतात लाँच, कंपनीने ट्विटद्वारे केली अधिकृत घोषणा)

तर नेकबँड हा हलक्या व्यायामासाठी अत्यंत फिट आहे. यापूर्वीचे मॉडेल खास पद्धतीने डिझाइन टी-शर्ट सोबत घालायचा होता. मात्र सोनीच्या नव्या वेअरेबल एसीला नेकबँन्ड प्रकारने गळ्यातच घालावा लागतो. यासाठी काही खास प्रकारचे शर्ट घालण्याची गरज नाही आहे.