सर्वात मोठे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म म्हणून सध्या भारतात पेटीएम (Paytm) लोकप्रिय आहे. पेटीएमने आपली सेवा 2010 साली लाँच केली होती. त्यानंतर सरकारने जेव्हा नोटबंदी लागू केली, त्या वेळी डिजिटल पेमेंटचा वापर खूप वाढला. याच वेळी पेटीएमचा वापर सर्वात जास्त झाला. वेगवेगळी पेमेंट करण्याचा सोप्या पद्धतीमुळे भारतीयांनी पेमेंट करण्याचा मार्ग बदलला. पेटीएमनेदेखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी काही सेवांवर कॅशबॅकसारख्या (Cashback) ऑफर आणल्या. आता जर का तुम्ही पेटीएमच्या माध्यमातून तुमचे लाईटचे बिल भरू इच्छित असलात तर तुम्ही पेटीएमच्या इलेक्ट्रिसिटी बिल ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.
सध्या पेटीएम 100 टक्के कॅशबॅकची ऑफर देत आहे. युटिलिटी बिल पेमेंट्ससाठी प्रत्येक तासाच्या बिल पेमेंटवर ही ऑफर मिळत आहे. या ऑफरअंतर्गत प्रत्येक तासाला एका लकी ग्राहकाला पेटीएम 100 टक्के कॅशबॅक देणार आहे. या ऑफरमध्ये जास्तीत जास्त 1000 रु. कॅशबॅकचा फायदा होऊ शकतो. यासाठी वापरकर्त्यांना BILLPAY हा प्रोमोकोड वापरणे आवश्यक आहे. ही ऑफर फक्त लाईट बिलावरच आहे. यासाठी एक प्रोमो कोडचा वापर एका सीए नंबरवरच केला जाऊ शकतो.
(हेही वाचा: Paytm ने लॉन्च केले क्रेडिट कार्ड; शॉपिंगवर मिळेल कॅशबॅकसह खास ऑफर्स)
एक प्रोमो कोड एक वापरकर्ता दिवसातून एकूण 3 वेळा वापरू शकतो. मिळणारा कॅशबॅक 24 तासांमध्ये तुमच्या पेटीएम वॉलेट जमा केला जाईल. याशिवाय POWER नावाचाही एक प्रोमोकोड आहे, ज्यामध्ये फ्लॅट रु 50 चा कॅशबॅक प्राप्त होते. युटिलिटी बिल पेमेंट्ससाठी पेटीएमवर गॅस बिल पेमेंट केले तर प्रत्येक तासाला 100 टक्के कॅशबॅक अशा ऑफर्सही चालू आहेत. यासाठी ग्राहकांना पेमेंटच्या वेळी PAYGAS हा प्रोमोकोड वापरणे आवश्यक आहे. या ऑफरमध्ये जास्तीत जास्त रु 500 चा कॅशबॅक मिळेल. त्याचबरोबर पाणी बिल भरण्यावरही प्रत्येक तासाला 100 टक्के कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे. त्यासाठी ग्राहकांना PAYWATER या प्रोमोकोडचा वापर करावा लागेल. इथे जास्तीत जास्त 1000 कॅशबॅक चा फायदा होऊ शकतो. पेटीएम अॅपच्या माध्यमातून तुम्ही आता विद्युत, गॅस, पाणी बिल भरणे यासोबत तुमचे मेट्रो कार्डही रिचार्ज करू शकता.