Paytm First Credit card (Photo Credits-Twitter)

देशात डिजिटलायजेशन जोरात होत आहे. त्यामुळे ऑनलाईन ट्रान्सजॅक्शन, नेट बँकींग, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यांसारख्या सुविधांचा वापर वाढत आहे. ऑनलाईन ट्रान्सजॅक्शनचा वाढता वापर लक्षात घेऊन मोबाईल पेमेंट कंपनी पेटीएम (Paytm)ने सिटी बँकेसह हातमिळवणी करत पेटीएम फर्स्ट क्रेडिट कार्ड (Paytm First Credit Card)लॉन्च केले आहे. ग्लोबल पेमेंट कंपनी Visa ने आपल्या नेटवर्कमध्ये Paytm Payments Bank ला सहभागी केल्याने आता पेटीएमच्या माध्यमातून Visa चे क्रेडिट कार्ड जारी केले जाईल.भारतात तब्बल 30 कोटी लोक पेटीएमचा वापर करतात.

Paytm ट्विट:

या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना प्रत्येक शॉपिंगवर 1% कॅशबॅक मिळेल. हे कॅशबॅक क्रेडिट कार्डमध्ये क्रेडिट होईल. या कार्डचे वार्षिक शुल्क 500 रुपये आहे. मात्र प्रत्येक वर्ष 50,000 रुपयांहून अधिक खर्च केल्यास त्यावर 500 रुपयांचे वार्षिक शुल्क माफ होईल.

सध्या पेटीएमचे 300 मिलियन युजर्स आहेत. त्यापैकी कमीत कमी 25 मिलियन युजर्स Paytm फर्स्ट कार्डच्या पर्यायाचा वापर करतात. युजर्स पेटीएम अॅपवरुन क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करु शकतात. या कार्डचे फिचर्स पेटीएम अॅपवरही उपलब्ध होतील. अॅपवर ऑफर आणि स्टेटमेंटची माहिती देखील उपलब्ध होईल.