Paytm चा बंपर सेल; या वस्तूंवर मिळणार 80% पर्यंत सूट
Paytm Cashback Days Sale (Photo Credit: Twitter)

नववर्षाच्या स्वागतासाठी नवी शॉपिंग करणार आहात? मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ई-कॉमर्स वेबसाईट्स फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि स्नॅपडील यांचे सेल वारंवार सुरु असतात. यात आता पेटीएमने देखील कॅशबॅक डेज सेलची (Paytm Cashback Days Sale) सुरुवात केली आहे. हा सेल 12-16 डिसेंबरपर्यंत असून यात कपडे, घरगुती वस्तू आणि अन्य इलेक्ट्रॉनिक सामानावर 20 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळत आहे.

पेटीएमच्या या कॅशबॅक डेज सेलवर 70-80% पर्यंत सूट मिळत आहे. त्याचबरोबर अनेक प्रॉडक्ट्सवर कॅशबॅकची ऑफरही उपलब्ध आहे.

# या सेलअंतर्गत वॉशिंग मशिनवर 10 हजारांची कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे आणि नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

# एयर प्यूरिफायर्स (Air Purifier) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पेटीएम सेलमध्ये त्यावर 20% पर्यंत कॅशबॅक मिळत आहे.

# बॅग्स आणि सुटकेस खरेदीवर ग्राहकांना 50% पर्यंत सूट आणि 30% पर्यंत कॅशबॅक मिळत आहे.

एलजी (LG) च्या प्रॉडक्सवर 20 हजारापर्यंत कॅशबॅक मिळत आहे.

# हिवाळा सुरु आहे. या दिवसांमध्ये गीझरची गरज भासते. त्यामुळे गीझर घेण्याचा विचार करत असाल तर या सेलमध्ये त्यावर 20% पर्यंत कॅशबॅक मिळत आहे.

# सॅमसंग, एलजी आणि अन्य ब्रँड्सच्या टीव्ही वर तुम्हाला 70% पर्यंतची सुट मिळेल.

# मायक्रोव्हेव खरेदी केल्यास 40% पर्यंत आणि फ्रिज खरेदीवर 60% पर्यंतची सूट मिळत आहे.

# स्मार्टफोन खरेदीवर 5 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

इतकंच नाही तर या सेलअंतर्गत खरेदी करताना एचडीएफसी बँकचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ट वापरल्यास 10% पर्यंत अतिरिक्त कॅशबॅक मिळत आहे.