OnePlus आणि Realme India कडून प्रोडक्ट वॉरंटी वाढवण्याची घोषणा
OnePlus Nord Render Images (Photo Credits: EvLeaks)

भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांचा आकडा पाहता दिग्गज स्मार्टफोन निर्माती कंपनी OnePlus आणि Realme India ने आपल्या प्रोडक्टची वॉरंटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वनप्लस कडून आपल्या प्रोडक्ट्सवर 30 जून पर्यंत वॉरंटी वाढवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याचसोबत रियअलमी इंडिया कडून सुद्धा त्यांच्या सर्व प्रोडक्ट्सवर येत्या 31 जुलै पर्यंत वॉरंटी वाढवण्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी आयटेल, शाओमी आणि ओप्पो यांनी आपल्या डिवाइसवर वॉरंटी वाढवण्याचे जाहीर केले होते.

वनप्लसच्या मते सर्व प्रोडक्ट्सवर मिळणारी वॉरंटी 30 जून पर्यंत वाढवली आहे. ज्यांची वॉरंटी 1 एप्रिल ते 29 जून 2021 दरम्यान संपणार होती. कंपनीचे असे म्हणणे आहे की, आमचे सर्विस सेंटर केंद्र सरकारच्या पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. स्थिती सामान्य होईपर्यंत सर्विस सेंटरसह डिलिव्हरी पुन्हा सुरु होणार आहे.(Realme GT लवकरच होणार भारतात लाँच, ट्विटद्वारे कंपनीने दिले 'हे' महत्त्वाचे संकेत)

रिअलमी इंडियानुसार सर्व प्रोडक्ट्सवर मिळणारी वॉरंटी 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे. या वॉरंटीचा फायदा 1 एप्रिल ते 20 जून 2021 दरम्यान संपणाऱ्या युजर्सला होणार आहे. कंपनीने लोकांना नेहमीनच मास्क घालण्याचे अपील केले आहे. Itel ने गुरुवारी स्मार्टफोन आणि फिचर फोनवर मिळणारी वॉरंटी दोन महिने म्हणजेच 60 दिवसांसाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. याचा लाभ अशा युजर्सला मिळणार आहे ज्यांची वॉरंटी 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान संपणार आहे. वॉरंटी एक्सटेंड करण्यासाठी युजर्सला 30 जून पूर्वी CarlCare मोबाईल अॅपवर रजिस्ट्रर करावी लागणार आहे.

POCO ने सर्वात प्रथम आपल्या स्मार्टफोनची वॉरंटी दोन महिने वाढवली होती. कंपनीनुसार, यामध्ये अशा युजर्सला फायदा घेता येणार आहे ज्यांची वॉरंटी मे आणि जून 2021 पर्यंत संपणार आहे.