वनप्लसने (OnePlus) मुंबईत आपला पहिला वनप्लस ओपन फोल्डेबल फोन (OnePlus Open) लाँच केला आहे. हा फोन एमराल्ड ग्रीन (Emerald Green) आणि व्हॉयजर ब्लॅक (Voyager Black) या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. वनप्लसने त्यांच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त OnePlus Open फोल्डेबल फोन लॉन्च केला आहे. वनप्लस ओपन फोल्डेबल फोनचे वजन 238 ग्रॅम आहे, त्यामुळे तो सहजपणे कॅरी करणे शक्य आहे. या फोनची बॉडी स्टेनलेस स्टील, टायटॅनियम फ्रेम आणि कार्बन फायबरपासून बनवली आहे.
वनप्लस ओपन फोल्डेबल फोनमध्ये फ्लॅगशिप इमेज क्वालिटी देण्यात आली आहे. या फोनमध्ये तीन पॉवरफुल सेन्सर्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये प्राथमिक सेन्सर 48MP Sony LYT-T808 Pixel Stacked सेन्सर आहे. कमी प्रकाशात शूटिंगसाठी, वनप्लस ओपन फोल्डेबल फोनमध्ये 64MP टेलिफोटो कॅमेरा आहे, जो 3x झूम आणि 6x झूम सेटिंग्जसह येतो. या फोनमध्ये AI सपोर्ट सेन्सरसह Ultra res Zoom देखील आहे. या फोनद्वारे तुम्ही 4K व्हिडिओ देखील शूट करू शकता.
View this post on Instagram
OnePlus Open फोल्डेबल फोनचा डिस्प्ले फोल्ड केल्यावर 6.31 इंच आहे व उघडलावर तो 7.82 इंच होतो. या फोन'मध्ये तुम्ही एकाच वेळी दोन टॅब उघडू शकता. त्याचबरोबर हा फोन गेमिंगच्या बाबतीतही चांगला आहे. या OnePlus फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आहे, जो 16GB LPDDR5X रॅम आणि 512GB UFS4.0 स्टोरेजसह येतो. या फोनमध्ये 4808 mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जरला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की फोन 1 ते 100 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 42 मिनिटे लागतात. OnePlus Open 5G तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो. (हेही वाचा: Two WhatsApp Accounts on Same Device: आता एकाच फोनमध्ये वापरू शकणार दोन व्हॉट्सअॅप खाती; Mark Zuckerberg ची नव्या फिचरची घोषणा)
OnePlus चा हा फोन 1,39,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे आणि त्याची प्री-बुकिंग 19 ऑक्टोबरपासून म्हणजेच आज OnePlus च्या अधिकृत साइट आणि ई-कॉमर्स साइट Amazon वर सुरू झाली आहे. OnePlus Open फोल्डेबल फोनच्या प्री-बुकिंगवर, तुम्हाला 8000 रुपयांचा ट्रेड बोनस आणि 12 महिन्यांचा विनाशुल्क ईएमआय मिळत आहे. तसेच, तुम्ही हा फोन ICICI बँक कार्ड किंवा इन्स्टंट बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला 5000 रुपयांची सूट मिळेल. वनप्लस ओपन फोल्डेबल फोनची पहिली विक्री 27 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या फोनसह, तुम्हाला Google One वर 6 महिन्यांसाठी 100GB स्पेस मिळेल, यासह YouTube Premium चे 6 महिने सबस्क्रिप्शन, Microsoft 365 चे 3 महिने सबस्क्रिप्शनही मिळेल.