Photo Credit: Flipkart

iPhone वापरकर्त्यांना तसेच iPhone नव्या घेण्याऱ्यांना प्रतिक्षा होती ती iPhone14 च्या नव्या सिरिजची (Series). बरेचं दिवसांपासून चर्चेत असलेला iPhone14 आता अॅपल कंपनी कडून लॉंच करण्यात आला आहे. तरी आयफोन 14 ची किंमत गगनाला भिडलेली आहे. सर्वसामान्याना परवडणाऱ्या किमतीत हा फोन उपलब्ध नाही. तरी या आठवड्यात अनरॉइड (Android) देखील आता काही नवीन फोन मार्केटमध्ये (Market) लॉंच (Launch) करणार आहेत. हे फोन जवळजवळ आयफोनच्या फिचर्सला (iPhone Featutre) टक्कर देण्यासारखे असले तर आयफोनच्या (iPhone) तुलनेत या फोनची किम्मत खुप कमी आहे. तर तुम्ही उत्तम कॅमेरा (Camera), रॅम (Ram), लूकसह (Look) 5G अनरॉइड फोन घेण्याच्या तयारीत असाल तर नव्याने लॉंच (Launch) होणारे हे नवे फोन तुमच्यासाठी आहेत असं म्हणायला हरकत नाही.

 

रिअल मी जीटी निओ ३ टी (Realme GT Neo 3T) हा रिअलमीचा नवा मॉडेल 16 सप्टेंबर (September) रोजी लॉंच (Launch) करण्यात येणार आहे. तर नव्याने मार्केटमध्ये (Market) एन्ट्री (entry) करणार असणारा या फोनची किंमत 30 हजार रुपये असण्याची चर्चा आहे. यामध्ये वापरलेल्या चिपमुळे (chip) त्याची थेट टक्कर Poco F4 आणि iQOO Neo 6 शी होईल. तरी स्मार्टफोन (Smart Phone) स्नॅपड्रॅगन 870 चिप, 80 W फास्ट चार्जिंग सपोर्ट (Fast Charging Support) आणि 120 Hz डिस्प्ले (Display) असे फिचर (Feature) असेल अशी माहिती रिअलमी (Realme) कडून देण्यात आली आहे.  याच बरोबर रिअलमी Realme Narzo 50i Prime आणि Realme C30s हे दोन फोन लॉंच (Launch) करणार आहेत. Realme Narzo 50i Prime 13 सप्टेंबरला (September) तर Realme C30s सप्टेंबरला लॉंच (Launch) करण्यात येणार आहे. (हे ही वाचा:- Amazon Great Indian Festival Sale: वर्षातील सर्वात मोठ्या ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेलची अॅमेझॉनकडून घोषणा, मिळवा 50 टक्क्यांहून अधिक सूट)

 

तसेच या आठवड्या विवो (Vivo) देखील नवीन फोन लॉंच (Launch) करणार असल्याची चर्चा आहे. विवोच्या इतर फोन प्रमाणेच कॅमेरा (Camera) या फोनचं खास वैशिष्ट्य ठरणार आहे. तरी या फोनची (Phone) किंमत मिड रेंजमध्ये (Range) असणार अशी माहिती विवो क़डून देण्यात आली आहे. तसेच या आठवड्यात Motorola Edge 30 Ultra, Lava Blaze Pro, TECNO Camon 19 Pro Mondrian Edition आणि iQOO Z6 Lite 5G हे नवे फोन लॉंच होणार आहेत. तर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असल्यास हे नवे 5G फोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतात.