अॅमेझॉन (Amazon) हे असे ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्हाला विविध उत्पादने मिळतात. अॅमेझॉनवर एक मग (Mug) विकला जात आहे, ज्याची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. हा मग सवलतीच्या दरात विकला जात असला तरी त्याची किंमत मात्र कमालीची आहे. या मग मध्ये तुम्हाला काय आहे आणि तो इतका महाग का आहे? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आम्ही Amazon वर उपलब्ध असलेल्या मग बद्दल बोलत आहोत. प्रत्यक्षात हा एक स्मार्ट मग आहे. त्याला Ember Temperature Control Smart Mug असं म्हणतात. या मगला स्मार्ट मग म्हणतात कारण, हा स्मार्ट मग मोबाईल अॅपवर काम करतो. तो रिचार्जेबल देखील आहे. या मग मध्ये तुम्हाला पाहिजे तेव्हा गरम कॉफी किंवा चहा मिळेल. हा मग काळ्या रंगाचा आहे. हा मग 80 मिनिटांच्या बॅटरी लाइफसह येतो. (हेही वाचा - Google IO 2022: गूगल ट्रान्सलेट वर आता संस्कृत, कोकणी सह 24 भाषांचा समावेश)
एम्बर टेम्परेचर कंट्रोल स्मार्ट मग (Ember Temperature Control Smart Mug) ची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. हा मग Amazon वर 1,09,032 रुपयांना विकला जात आहे. सध्या, हा स्मार्ट मग विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि तुम्ही 47% च्या सवलतीनंतर तो 57,385 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला नो-कॉस्ट ईएमआय, कॅशबॅक आणि बँक ऑफर्सचे पर्यायही दिले जात आहेत.
Ember Temperature Control Smart Mug चे फिचर्स -
एम्बर टेम्परेचर कंट्रोल स्मार्ट मग पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचा बनलेला आहे. तुम्ही तो चार्ज करू शकता आणि एक ते दीड तास आरामात वापरू शकता. हा स्मार्ट मग फक्त हातानेच धुता येतो. तुम्ही तो मायक्रोवेव्हमध्ये वापरू शकत नाही. यात एक स्मार्ट एलईडी लाइट देखील आहे. जो तुम्हाला तुमचे पेय तुमच्यासाठी कधी तयार आहे, हे सांगतो.