Google (Photo Credits: Google)

Google I/O 2022 मध्ये कंपनी ने आज अनेक नवे फीचर्स आणि डिव्हाईस सादर केले आहेत. गूगल कडून हा मेगा इव्हेंट दरवर्षी आयोजित केला जातो. गूगलने आपल्या ट्रान्सलेशन टूल मध्ये भाषांची यादी अपडेट केली आहे. गूगल ट्रान्सलेट (Google Translate) मध्ये आता 24 नव्या भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या यादीमध्ये 8 भारतीय भाषांचा समावेश आहे. त्यामुळे आता एकूण 133 भाषांना गूगल ट्रान्सलेट मध्ये भाषांतरित करता येणार आहे.

आज जाहीर झालेल्या भाषांच्या यादीमध्ये संस्कृत, कोकणी, भोजपुरी, आसामी, डोगरी, मैथिली, मणिपुरी, मिझो यांचा समावेश आहे. गूगलने दिलेल्या माहितीनुसार आता नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या भाषांना जागतिक स्तरावर 300 मिलियन पेक्षा अधिक लोकं वापरतात. मिजो ही भाषा भारतात नॉर्थ ईस्ट मध्ये 800,000 जण बोलतात. तसेच मध्य आफ्रिकेमध्ये Lingala 45 मिलियन लोक वापरतात. SMS Scams: सावधान! Google Play Store वरुन गुगलने हटवली 150 Mobile Apps, तुमच्या मोबाईलमध्ये आहेत?

गूगल ट्रान्सलेट मध्ये समाविष्ट झालेल्या या नवीन भाषा झिरो-शॉट मशीन ट्रान्सलेशन द्वारा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. जेथे मशीन लर्निंग मॉडेल फक्त monolingual text पाहतो. झिरो-शॉट मशीन ट्रान्सलेशन मुळात उदाहरण न पाहता दुसऱ्या भाषेत भाषांतर करायला शिकते. हे तंत्रज्ञान प्रभावी असले तरी ते परिपूर्ण नसल्याची माहिती Google ने अधिकृत ब्लॉगपोस्टमध्ये दिली आहे.