Motorola E7 Plus (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोला (Motorola) ही भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. बदलत्या काळानुसार आपल्या स्मार्टफोनमध्ये आधुनिक बदल करत अॅडव्हान्स स्मार्टफोन्स त्यांनी भारतीय बाजारात आणले आहेत. त्यातच आता लवकरच मोटोरोला आपला नवा स्मार्टफोन Motorola E7 Plus भारतात लाँच करणार आहे. येत्या 23 सप्टेंबरला हा स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर (Twitter) याबाबत माहिती दिली असून येत्या 23 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) लाँच करणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात हा स्मार्टफोन लाँच झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारानुसार 149 यूरो (जवळपास 13,000 रुपये) इतकी असू शकते. मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 48 मेगापिक्सल असलेला Motorola One Vision Plus लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत

या स्मार्टफोनच्या डिस्प्लेविषयी बोलायचे झाले तर, यात 6.5 इंचाची एचडी डिस्प्ले असेल. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 10 वर काम करतो. हा फोन ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 Soc वर काम करेल. त्याचबरोबर यात Adreno 610 GPU आणि 4Gb रॅम असू शकते.

या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 48MP चा कॅमेरा आणि 2MP चा सेकेंडरी कॅमेरा असू शकतो. त्याचबरोबर 8MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth v5.0, GPS/ A-GPS, Micro-USB आणि 3.5mm हेडफोन जॅक असू शकतो. त्याचबरोबर 5000mAh ची बॅटरी लाईफ सुद्धा असू शकते.