LG कंपनीचा भारतीय बाजारात ट्रिपल धमाका! लाँच केले W41 सीरिजचे 3 स्मार्टफोन्स
LG W41 Series Smartphones (Photo Credits: LG)

LG कंपनीने भारतीय बाजारात LG W41, LG W41 Plus आणि LG W41 Pro हे तीन जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या स्मार्टफोन्सची बरीचशी वैशिष्ट्ये ही एकसारखीच आहेत. केवळ यांच्या रॅम आणि स्टोरेजमध्ये फरक आढळेल. इतर वैशिष्ट्ये बॅटरी लाईफ, कॅमेरा ही सारखीच आहेत. या स्मार्टफोन्समध्ये पंचहोल डिस्प्ले डिझाईन दिले आहे. या फोन्समध्ये डेडिकेटेड गुगल असिस्टंट बटन दिले गेले आहे. LG W41 सीरिजचे हे स्मार्टफोन्स भारतीय बाजारात रियलमी, रेडमी, पोको यांसारख्या स्मार्टफोन्सला तगडी टक्कर देणार आहेत.

LG W41 स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 13,490 रुपये आहे. LG W41+ स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 14,490 रुपये इतकी आहे. तर LG W41 Pro हा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. ज्याची किंमत 15,490 रुपये इतकी आहे. हे स्मार्टफोन्स ब्लू आणि मॅजिक ब्लू या दोन रंगात उपलब्ध केले आहेत.हेदेखील वाचा- LG Signature OLED R: एलजी कंपनीने सादर केला जगातील पहिला Rollable Smart TV; किंमत फक्त 64 लाख, जाणून घ्या वैशिष्ठ्ये

LG W41, LG W41 Plus आणि LG W41 Pro वैशिष्ट्ये

या तीनही स्मार्टफोन्समध्ये 6.5 इंचाची HD+ डिस्प्ले दिली गेली आहे. या फोनमध्ये

ऑक्टा-कोर MediaTek Helio G35 प्रोसेसर आहे. हे Android 10 वर काम करतात. या स्मार्टफोन्सच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. त्याचबरोबर 8MP, 2MP आणि 5MP चे तीन अन्य सेंसर कॅमेरा सेटअर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 8MP चा कॅमेरा दिला आहे.

LG W41, LG W41 Plus आणि LG W41 Pro कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, यात 4G LTE, Wi-Fi, ब्लूटुथ 5.0, GPS/A-GPS आणि USB टाइप-सी पोर्टसुदधा देण्यात आला आहे. या फोन्समध्ये 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे.