LG Signature OLED R, World’s First Rollable Smart TV Launched (Photo Credits; IANS)

दक्षिण कोरियाची आघाडीची होम अप्लायंसेस तयार करणाऱ्या एलजी इलेक्ट्रॉनिक्सने (LG Electronics) इंडस्ट्रीमधील पहिला रोलेबल टीव्ही (World's First Rollable TV) बाजारात आणला आहे. या टीव्हीचे नाव OLED R असे असून, महत्वाचे म्हणजे याची किंमत तब्बल 64 लाख रुपये आहे. एलजीने नुकताच हा टीव्ही आपल्या देशांतर्गत बाजारात दाखल केला आहे. एलजीने म्हटले आहे की, जगातील पहिल्या रोलेबल टीव्हीचे ओवरसीज लॉन्च अद्याप निश्चित झाले नाही. प्रत्येक देशातील कोरोनाची परिस्थिती पाहून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. या टेक जायंटने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरातील हाय-एंड ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी हा टीव्ही बाजारात आणला आहे.

याबाबत बोलताना एलजी कंपनी म्हणाली, सेल्फ-लाइटिंग पिक्सेल तंत्रज्ञानाचा अनुभव देणारे फ्लेक्सिबल OLED डिस्प्ले असणारे हे उत्पादन, उच्च श्रेणीतील ग्राहकांना एक आगळा वेगळा अनुभव देण्यासाठी आणि प्रीमियम टीव्ही बाजारामधील आपले स्थान मजबूत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. RX नावाचे 65-इंच टीव्ही मॉडेल त्याच्या स्क्रीनद्वारे हायलाइट केले गेले आहे, जे एका बॉक्समधून निघून आत गुंडाळले जाऊ शकते. हा एलजी रोलिंग टीव्ही तीन वेगवेगळ्या मोडमध्ये वापरला जाऊ शकतो, ज्यामध्ये तीन प्रकारचे डिस्प्ले आकार उपलब्ध आहेत.

कंपनीचा दावा आहे की जर हा टीव्ही दिवसातून दोनदा गुंडाळला तर, तो 34 वर्षांपर्यंत व्यवस्थित काम करू शकेल. हा जगातील पहिला OLED टीव्ही आहे ज्याची स्क्रीन बोलण्यावर कार्य करते. यामध्ये डिस्प्ले ऑप्टिमाइझ करण्यासाठी पिक्सेल डिमिंग तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे, जो सुमारे 3.3 कोटी सेल्फ-इमिटिंग पिक्सेलला सपोर्ट करतो. टीव्हीमध्ये एलजीचा सेकंड जनरेशन अल्फा 9 इंटेलिजेंट प्रोसेसर बसविण्यात आला आहे. अ‍ॅमेझॉन अलेक्सा फीचरच्या मदतीने व्हॉइसद्वारे हे देखील नियंत्रित केले जाऊ शकते, जे वापरकर्त्याच्या सूचनांनुसार कार्य करेल. (हेही वाचा: यंदा स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करताय का? Amazon आणि Flipkart वर 'या' TV वर मिळतोय 57 हजार रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट; जाणून घ्या किंमत)

हा टीव्ही गेल्या वर्षी अमेरिकेत आयोजित कस्टम इलेक्ट्रॉनिक्स शो दरम्यान सादर करण्यात आला होता. या रोलेबल टीव्हीचे उत्पादन व गुणवत्ता तपासणी कुशल  कारागीर यांच्यामार्फत सोलच्या जवळपास 260 कि.मी. दक्षिणपूर्व, गुमी येथील एलजीच्या टीव्ही असेंब्ली लाइनवर केली जातील.