यंदा स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करताय का? Amazon आणि Flipkart वर 'या' TV वर मिळतोय 57 हजार रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट; जाणून घ्या किंमत
Smart TV (Photo Credit - pixabay)

यंदा तुम्ही स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण, Amazon आणि Flipkart सेलमध्ये तुम्हाला अनेक टीव्हीवर 57 हजार रुपयांपर्यंत बंपर डिस्काऊंट देण्यात येत आहे. सॅमसंग, एलजी, सोनी, टीसीएल, सोनी टीव्हीवर तुम्हाला खास सुट मिळत आहे. टीव्ही खरेदी करण्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे. चला तर बंपर डिस्काऊंट देणाऱ्या या लोकप्रिय कंपन्यांच्या कोणत्या आहेत. हे जाणून घेऊयात...Philips 58 इंच 6600 Series 4K TV वर 80 हजार रुपयांची सूट - अॅमेझॉन सेलमध्ये फिलिप्सच्या 58 इंचाच्या टीव्हीवर सर्वोत्तम डिस्काऊंट देण्यात आला आहे. अॅमेझॉनवर आपण फक्त 39,999 रुपयांमध्ये 6600 सीरिज 4K टीव्ही खरेदी करू शकता. फिलिप्स या टीव्हीवर सुमारे 80 हजार रुपयांची सूट देत आहे. 3 HDMI पोर्ट आणि 2 यूएसबी पोर्ट असलेल्या या स्मार्ट टीव्हीमध्ये आपण नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, झी 5 आणि डिस्ने हॉटस्टारसह बरेच अ‍ॅप्स चालवू शकता. याशिवाय जुनी टीव्ही देऊन तुम्ही आणखी सूट मिळू शकते. (वाचा - चीनची लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Oppo ने लाँच केला पहिला Smart TV; जाणून घ्या व्हेरिएंट, किंमत आणि खास फिचर्स)

LG 43 इंच 4K स्मार्ट टीव्ही वर 18 हजाराची सूट -

एलजीने स्मार्ट टीव्ही खरेदी करणाऱ्यासाठी जबरदस्त ऑफर आणल्या आहेत. त्यामुळे आपण केवळ 43,990 रुपयांमध्ये 43 इंचाचा टीव्ही खरेदी करू शकता. या एलजी टीव्हीची किंमत 52,990 रुपये आहे. ज्यावर ग्राहकांना 18 हजार रुपयांची सूट मिळत आहे. एलजीच्या स्मार्ट टीव्हीमध्ये 3 HDMI पोर्ट आणि 2 यूएसबी पोर्ट तसेच अनेक उत्कृष्ट फिचर्स देण्यात आले आहेत.

Samsung The Frame 50 इंच 4K स्मार्ट टीव्हीवर 42 हजार रुपयांची सूट -

फ्लिपकार्टवर तुम्ही सॅमसंगच्या द फ्रेम सीरिजमधून 50 इंचाचा टीव्ही फक्त 69,999 रुपयांत खरेदी करू शकता. या सॅमसंग टीव्हीची किंमत 1,12,900 रुपये आहे. ज्यावर कंपनी 42 हजार रुपयांहून अधिक सवलत देत आहे. सॅमसंगच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये जबरदस्त फीचर्स आहेत.

LG 65 इंच 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्हीवर 57 हजारांची सूट -

अॅमेझॉन सेलमध्ये आपल्याला 65 इंचाचा टीव्ही खरेदी करायचा असेल तर एलजीने तुमच्यासाठी सर्वोत्तम डील घेऊन आला आहे. तुम्ही एलजीचा 4 के अल्ट्रा एचडी स्मार्ट आयपीएस एलईडी टीव्ही 41% सवलतीत केवळ 82,990 रुपयांत खरेदी करू शकता. विक्रीदरम्यान एलजी या टीव्हीवर 57,000 हजारांची सूट देत आहे.

सोनी ब्राव्हिया 55 इंच 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी टीव्ही -

ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान आपण सोनीचा टीव्ही अॅमेझॉनवर 16% सवलतीच्या दरात केवळ 89,890 मध्ये खरेदी करू शकता. 55 इंचाच्या सोनी ब्राव्हिया 4k अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी टीव्हीची किंमत 1,06,900 रुपये आहे. परंतु, यावर 17,010 रुपयांच्या सूट देण्यात आली असून Amazon सेलमध्ये तुम्ही हा 89,890 रुपयांत खरेदी करू शकता.