Oppo launches first Smart TV (Photo Credit - Twitter)

चीनची लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Oppo ने अखेर आपला पहिला स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. कंपनीने OPPO TV S1 आणि OPPO TV R1 हे दोन फ्लॅगशिप मॉडेल्स लाँच केले आहेत. ओप्पोने S1 टीव्हीचे 65 इंचाचे मॉडेल 7,999 युआन म्हणजे 87,810 रुपयांमध्ये लाँच केले आहे. तसेच R1 सीरिजचे दोन मॉडेल बाजारात आणले आहेत. या 55 इंच मॉडेलची किंमत 3,299 युआन म्हणजे 36,165 रुपये आहे. याशिवाय 65 इंचाच्या मॉडेलची किंमत 4,299 युआन म्हणजेच 47,169 रुपये ठेवली आहे. लवकरचं Oppo हा टीव्ही भारतातदेखील लाँच करणार आहे. OPPO TV S1 फिचर्स -  OPPO च्या 65 इंचाच्या स्क्रीन टीव्हीमध्ये S 1 मॉडेल QLED पॅनेलसह 4K रेझोल्यूशनसह (3840 × 2160 पिक्सल) देण्यात आला आहे. ज्याचा मॅक्सिमम ब्राइटनेस 15090 निट्स आहे. या टीव्हीचा रीफ्रेश दर 120 हर्ट्ज आहे. ओप्पोचा हा फ्लॅगशिप टीव्ही MediaTek MT9950 चिपसेटसह येतो. ज्यामध्ये 8.5 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेज क्षमता आहे. हा स्मार्ट टीव्ही कलरओएस ऑपरेटिंग सिस्टमसह आहे, जो अनेक चाइनीज स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला सपोर्ट करतो. (हेही वाचा - लवकरच Reliance Jio बाजारात घेऊन येणार सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन; किंमत फक्त 2500 ते 3000 रुपये)

दरम्यान, ओप्पोच्या या टीव्हीमध्ये Dynaudio च्या 85 वॅटचे 18 स्पीकर्स आहेत. त्यामुळे कंपनीने सर्वोत्कृष्ट साऊंड गुणवत्तेचा दावा केला आहे. ओप्पो टीव्ही एस 1 मध्ये एक पॉपअप कॅमेरा आहे. ज्याद्वारे व्हिडिओ कॉलिंग करता येते. यात वॉयस असिस्टेंस आणि फार-फील्ड माइक्रोफोन सारखे फिचर्सही देण्यात आले आहेत. ओप्पोच्या या टीव्हीमध्ये HDMI 2.1, WiFi 6, NFC, Dolby Vision, Dolby Atmos तसेच 8K व्हिडिओ प्लेबॅक सपोर्ट देण्यात आला आहे.

OPPO TV R1 फिचर्स -

ओप्पोने R1 टीव्ही सिरिजचे दोन मॉडेल्स लाँच केले आहेत. ते अनुक्रमे 55 इंच आणि 65 इंचाचे आहेत. MediaTek MTK9652 चिपसेटसह या दोन्ही टीव्हीमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आहे. ओप्पोचे हे दोन्ही टीव्ही 8 K व्हिडिओ प्लेबॅकला सपोर्ट करतात. ओप्पो टीव्ही R1 4 K एलसीडी पॅनेल आणि एलईडी बॅकलाइटसह आहे. (हेही वाचा - चीनमध्ये OnePlus 8T ची विक्रमी खरेदी; 1 मिनिटात 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या स्मार्टफोनची विक्री)

याशिवाय ओप्पोच्या या दोन्ही स्मार्ट टीव्हीच्या उर्वरित फिचर्समध्ये HDMI 2.1, WiFi 6, Dolby Audio, NFC, पॉपअप कॅमरा आदींचा समावेश आहे. ओप्पो टीव्ही आर 1 सिरिजट्या या दोन्ही टीव्हीमध्ये ColorOS ऑपरेटिंग सिस्टम आहे. तसेच या टीव्हीमध्ये 20 वॅटचे स्पीकर आहेत. ओप्पो टीव्ही लवकरचं एमआय, रियलमी, वनप्लस आदी टीव्ही प्रमाणेचं भारतात आपला ठसा उमटवेल. मोबाईल फोन प्रमाणेचं ओप्पोच्या टीव्हीला ग्राहक नेमकी कसा प्रतिसाद देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.