Lava smartphone (PC - pixabay)

भारतीय फोन निर्माता कंपनी Lava यंदा अनेक नवीन स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या विचारात आहे. कंपनी उद्या म्हणजेचं 7 जानेवारीला आपला नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. कंपनीने यासंदर्भात आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर खुलासा केला आहे. तथापि, कंपनीने आपल्या आगामी स्मार्टफोनचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. परंतु, ट्विटरवर त्यांच्याशी संबंधित नवीन टीझर्स जाहीर करण्यात आला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर फोनमधील फिचर्सचा अंदाज काढता येईल.

कंपनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, आगामी स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात येणार आहे. कंपनीने एका पोस्टमध्ये, फोनची वैशिष्ट्य दर्शविले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, कंपनी या वैशिष्ट्यासह आपला नवीन कमी बजेट स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. दुसर्‍या ट्वीटमध्ये काही वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ज्यात वापरकर्त्यांना लावाच्या आगामी स्मार्टफोनमध्ये एक सिंगल, ड्युअल किंवा ट्रिपल कॅमेरा देण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याशिवाय फोनमध्ये युजर्सला 5 एमपी, 8 एमपी आणि 16 एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. (वाचा - Xiaomi Mi 10i स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत )

आपल्या आगामी स्मार्टफोनच्या लॉन्च तारखेची घोषणा करताना कंपनीने म्हटले होते की, नवीन स्मार्टफोन गेम चेंजर असेल. वापरकर्त्यांना या मेड इन इंडिया स्मार्टफोनचा अभिमान वाटेल. तथापि, अद्याप या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये समोर आलेली नाहीत. यासाठी वापरकर्त्यांना उद्या म्हणजेच 7 जानेवारीपर्यंत थांबावे लागेल. लावाने डिसेंबर 2020 मध्ये एंट्री-लेव्हल स्मार्टफोन Lava BeU लाँच केला होता.

लावा बीईयू स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा स्मार्टफोन महिलांसाठी लॉन्च करण्यात आला असून तो महिला केंद्रित स्मार्टफोन आहे. याची किंमत 6,888 रुपये आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड गो एडिशनवर कार्य करतो आणि यात ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 2 जीबी रॅम आणि 32 जीबी अंतर्गत स्टोरेज आहे. यात महिलांच्या संरक्षणासाठी सेफ्टी अ‍ॅपचा वापर करण्यात आला आहे.