Xiaomi Mi 10i स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत 
Xiaomi Mi 10i (Photo Credits: Xiaomi India)

शाओमी कंपनीने मंगळवारी देशातील बहुप्रतिक्षित Mi 10i स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यापूर्वी कंपनीने या सीरिजमध्ये Mi 10, Mi 10T आणि Mi 10T Pro हँडसेट लॉन्च केला होता. Mi 10i  स्मार्टफोनमध्ये  स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसरवर आणि सॅमसंग HM2 सेंसर असणारा 108 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. कंपनीने यापूर्वीच सांगितले होते की, Mi 10i खासकरुन भारतीय मार्केटसाठी कस्टमाइज केला असून यामध्ये i म्हणजे India असा आहे.(Xiaomi चा नवा स्मार्टफोन Redmi Note 9T 5G ची लाँचिंग डेट आली समोर, 'ही' असू शकतात या मोबाईलची खास वैशिष्ट्ये)

या स्मार्टफोनमध्ये 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 20,999 रुपये आहे. तर 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 21,999 रुपये आणि 8जीबी आणि 128जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 23,999 रुपयांना उपलब्ध करुन दिला आहे. हँडसेट देशात पॅसिफिक सनराइज, अटलांटिक ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक रंगात खरेदी करता येणार आहे. तर येत्या 7 जानेवारीला यासाठी सेल सुरु होणार असून अॅमेझॉन प्राइमच्या युजर्सला तो खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच अॅमेझॉन इंडिया व्यतिरिक्त mi.com वर सेल साठी सुद्धा उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

स्मार्टफोनच्या फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 6.67 इंचाचा फुलएची रेज्यॉल्यूशन असणारा डॉटडिस्प्ले दिला आहे. स्क्रिनचा अॅडेप्टिव्ह सिंक रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. फोनच्या सुरक्षिततेसाठी फ्रंट आणि बॅकवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 दिले आहे. शाओमीच्या या लेटेस्ट फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर दिला गेला आहे. फोनमध्ये X52 5G मॉडेम असून जो 5G कनेक्टिव्हिटी सपोर्ट करणार आहे. तसेच 6जीबी आणि 8जीबी रॅम दिली गेली आहे. स्टोरेजसाठी 64GB आणि 128GB चा ऑप्शन ही मिळणार आहे.

Mi 10i ला पॉवर देण्यासाठी 4820mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. फोनच्या बॉक्समध्ये 33W फास्ट चार्जर ही मिळणार आहे. हेडसेटचे डायमेन्शन 165.38X76.8X9 मिलीमीटर आणि वजन 214.5 ग्रॅम आहे. फोटोग्राफीसाठी Mi 10i मध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. फोनमध्ये अपर्चर एफ/1.75 सह 108 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, अपर्चर एफ/2.2 सह 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर दिला आहे. हेडसेटमध्ये एका बाजूला 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा ही दिला आहे.(OnePlus 8T 5G स्मार्टफोन दिला जातोय धमाकेदार डिस्काउंट ऑफर, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

शाओमी एमआय 10 आय IP53 रेटिंगसह येणार आहे. तसेच फोनमध्ये ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स, 3.5 एमएम हेडफोन जॅक, युएसबी टाइप सी पोर्ट, IR सेंसर दिले आहे. फोन अॅन्ड्रॉइड बेस्ड MIUI 12 वर काम करणार आहे.