Lava कंपनीने केली सर्वात स्वस्त स्मार्टबँडची घोषणा, काय असतील या नव्या BeFit फिटनेस बँडची वैशिष्ट्ये
Lava BeFit (Photo Credits: Twitter)

बदलत्या काळानुसार आपल्या प्रोडक्ट्समध्ये बदल आणण्यासाठी अनेक स्मार्टफोन्स कंपन्यांनी आपले वेअरेबल प्रोडक्ट्स देखील बाजारात आणले आहेत. यात Lava कंपनी देखील मागे नसून लवकरच आपला नवा स्मार्टबँड (Smartband) आणणार असल्याची घोषणा या कंपनीने केली आहे. Lava BeFit असे या फिटनेस ब्रँडचे (Fitness Band) नाव असून लवकरच हा भारतात लाँच केला जाईल. हा स्मार्टबँड भारतीय बाजारातील अन्य Mi, Realme, OnePlus च्या बँडला जबरदस्त टक्कर देईल. या स्मार्टबँडचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा सर्वात स्वस्त स्मार्टबँड असणार आहे.

या स्मार्टबँडमध्ये आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या स्मार्टबँडमध्ये अनेक आकर्षक फिचर्स देण्यात आली आहेत. याच्या डिझाईनविषयी बोलायचे झाले तर, यात आयताकृती कलर्ड स्क्रीन देण्यात आली आहे. याच्या खालच्या बाजूस एक कपॅसिटीव बटण असेल. याच्या स्क्रीनवर यूजर्सला स्टेप काउंट, टाइम, बॉडी टेम्परेचर इत्यादींविषयी माहिती मिळेल. या फिटनेस बँडमध्ये अॅक्टिव्हिटी ट्रॅकर, हार्ट रेट मॉनिटर आणि SpO2 सेंसर मिळतील.हेदेखील वाचा- Lava कंपनी उद्या भारतात लाँच करणार नवा स्मार्टफोन; वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह असतील 'हे' खास फिचर्स

Lava BeFit फिटनेस बँड 26 जानेवारीपासून Amazon आणि लावा कंपनीच्या अधिकृत साइटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच ऑफलाईन मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध होईल. या फिटनेस बँड काळ्या रंगात उपलब्ध होईल.

या स्मार्टबँडमध्ये 1.1 इंचाची कलर डिस्प्ले देण्यात आली आहे. लावा कंपनीचा दावा आहे की, या स्मार्टबँडमुळे शरीराचे तापमान मोजता येऊ शकते. या बँडची किंमत 2699 रुपये इतकी असू शकते. या बँडमध्ये यूजर्सला स्क्रिनवर नोटिफिकेशन्स, कॉल्स, ईमेल्स, मेसेज आणि सोशल मिडिया अलर्टसुद्धा मिळतील. तसेच याचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला 24 तास तुम्हाला हार्ट रेट ट्रॅक करता येईल. त्याचबरोबर यात GPS, वायब्रेशन अलर्ट, रन प्लानसारखे फीचर्स सुद्धा मिळतील.