अल्पावधी काळात भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय झालेली शाओमी कंपनी आता आपले नवे गॅजेट भारतीय बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. शाओमी Mi बँड 4 (Xiaomi MI Band 4) असे या गॅजेटचे नाव असून हा स्मार्टबँड येत्या 11 जूनपासून भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. शाओमीने या बँडच्या लाँचिंगची माहिती चीनी माईक्रोब्लॉगिंग वेबसाईट वीबो वर दिली आहे.
माईक्रोब्लॉगिंग वेबसाईट वीबोवरील पोस्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, Mi Band 4 मध्ये कलर डिस्प्ले मिळू शकतो. त्याची साईज पहिल्यापेक्षा अधिक मोठी असेल. याआधीही या फिचरबद्दल अनेक लिक रिपोर्ट समोर आले होते. तर काही नवीन रिपोर्ट्समध्ये Mi Band 4 मध्ये ओएलईडी डिस्प्ले मिळणार असुन त्याचा आकार Mi Band 3 पेक्षा अधिक मोठा असणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
Mi फिटनेस बँड 4 मध्ये मोठी बॅटरीही मिळणार आहे. ज्यामुळे आपण जास्त कालावधीसाठी या बँडचा वापर करू शकाल. नवीन फिटनेस बँडमध्ये शाओमी एनएफसी सपोर्टही देण्याची शक्यता आहे. 2000 ते 3000 रुपयांच्या आसपास शाओमीच्या या बँडची किंमत असल्याचं बोललं जात आहे.
Redmi ची आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक खास भेट, लाँच केली 20 इंचाची सूटकेस
या स्मार्टबँड चे आधीचे व्हर्जन असलेला शाओमी Mi Band 3 चे 10 लाख यूनिट्स आतापर्यंत विक्री झाली आहे. या बँडची किंमत 1999 रुपये आहे.