Redmi ची आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक खास भेट, लाँच केली 20 इंचाची सूटकेस
Redmi 20 Inches suitcase(Photo Credits: Redmi)

अल्पावधी काळातच स्मार्टफोन जगतात आपली स्वत:शी अशी ओळख निर्माण केलेल्या रेडमी (Redmi) कंपनीने एक पाऊल पुढे टाकत आता आणखी एक नवीन उपकरण लाँच केले आहे. रेडमी कंपनीने नुकतीच बाजारात 20 इंचाची सूटकेस लाँच केली आहे. या कंपनीने आतापर्यंत स्मार्ट स्पोर्ट्स शूज, वॉशिंग मशीन आणि एअर कंडीशनर यांसारखे अनेक अफलातून उपकरणे बाजारात आणली आहेत. लाल रंगात ही सूटकेस उपलब्ध आहे.

20 इंचाच्या या सूटकेसच्या एका बाजूला कस्टम फॉन्टमध्ये पांढऱ्या रंगातील रेडमीचा लोगो दिसतोय. ही सूटकेस बनविण्यासाठी कॉस्ट्रॉन पीसी मटेरियलच्या तीन थरांचा वापर करण्यात आल्याचं कंपनीने सांगितलंय. यामुळे ही सूटकेस इतरांच्या तुलनेत अधिक मजबूत असल्याचं कंपनीने म्हटलं. सूटकेसला मॅट फिनिशिंग देण्यात आली असून 4 व्हिल्स 360 डिग्रीत रोटेट होऊ शकतात. ट्रॉलीचं हँडल अॅल्युमिनियम पासून तयार करण्यात आलं आहे. हे हँडल 4 गिअरपर्यंत अॅडजस्ट करता येतं.

सूटकेसच्या आतील बाजूबाबत सांगायचे झाले तर, विविध आकाराच्या सामानाचा विचार करुन यात निरनिराळे कप्पे आहेत. याशिवाय यामध्ये मल्टिफंक्शनल पॉकेट देखील आहेत. आतील बाजूसाठी सॉफ्ट आणि स्क्रीन फ्रेंडली अशा पॉलिस्टर व्हायबर फॅब्रिकचा वापर करण्यात आला आहे.

Xiaomi Redmi 7 लॉन्च, सुपर फिचर्ससह कमी किंमतीत आजच खरेदी करा

 जून महिन्यात या सूटकेसची विक्री सुरू होईल. याची किंमत 299 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 3000 रुपये आहे. रेडमी K20 स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या काही निवडक ग्राहकांसाठी ही सूटकेस केवळ 199 युआन म्हणजे जवळपास 2000 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे.