Redmi 7 (Photo Credits-Twitter)

चीन (China) कंपनी शाओमीने (Xiaomi) त्यांचा रेडमी 7 (Redmi 7) स्मार्टफोन लॉन्च केला आहे. एका कार्यक्रमात हा स्मार्टफोन झळकवण्यात आला होता. परंतु रेडमी 7 सध्या चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तर भारतात 19 मार्च रोजी Android Go आधारित Redmi Go लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.26 इंच एचडी डिस्प्ले देण्यात आला असून एक्सस्पेक्टेड रेश्यो 19:9 असणार आहे. तसेच Qualcomm Snapdragon 632 प्रोसेसर दिला आहे. रेडमीच्या या स्मार्टफोनची मेमरी तीन वेरियंटमध्ये देण्यात आलेली आहे. त्यात 2GB RAM सोबत 16GB मेमरी दिली आहे. दुसऱ्या वेरियंटमध्ये 3GB RAM सह 32GB इंटरनल मेमरी देण्यात आली असून तिसऱ्या वेरियंटमध्ये 4GB RAM आणि 64GB इंटरनल मेमरीची सोय केली आहे.(हेही वाचा-दमदार Huawei Nova 4e लॉन्च, या स्मार्टफोनमध्ये 32MP कॅमेरासह मिळणार अनेक खास फिचर्स)

रेडमीच्या या स्मार्टफोनसाठी 2 रियर कॅमेरे आहेत. सेल्फी फोटोसाठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. डिझाईन बद्दल बोलायचे झाले तर नोट 7 पेक्षा वेगळे नाही आहे. या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 7,148 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4,000mAh पॉवर असलेली बॅटरी दिली आहे.