Know Your Postman अॅप लॉन्च; तुमच्या परिसरातील पोस्टमनला करता येईल Locate
Mobile Apps | Representational Image (Photo Credits: PTI)

मुंबई टपाल खात्याने (Mumbai Postal Department) आज राष्ट्रीय मेल दिन (National Mails Day) निमित्त 'नो युअर पोस्टमन' (Know Your Postman) हे मोबाईल अॅप्लिकेशन (Mobile Application) लॉन्च केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या अॅपद्वारे नागरिक आपल्या परिसरातील बीट पोस्टमनचा (Beat Postman) तपशील मिळवू शकतात. त्यासाठी नागरिकांना परिसर, क्षेत्र, पोस्ट ऑफिसचे नाव आणि पिन कोड ही माहिती अॅपमध्ये भरावी लागेल.

मुंबई टपाल विभागाने डिझाईन आणि डेव्हलप केलेले हे अँड्रॉईड अॅप्लिकेशन(Android Application)  गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर उपलब्ध आहे. सध्या या अॅप चे फक्त अँड्रॉइड व्हर्जन उपलब्ध आहे. सध्यातरी या अॅपच्या आयओएस (iOS) व्हर्जनबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मुंबई शहर आणि उपनगरातील 86,000 हून अधिक ठिकाणाची माहिती डेटाबेसमध्ये उपलब्ध आहेत. या अॅपमधून स्थानिक पोस्टमन, त्याचे संपर्क क्रमांक, संलग्न पोस्ट ऑफिसचे नाव, पत्ता आणि फोन नंबर बद्दल माहिती नागरिकांना मिळते.

"या अॅपद्वारे मुंबई पोस्टचा डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्याचा इनहाऊस प्रयत्न आहे. आतापर्यंत 86,000 पेक्षा जास्त पत्ते टॅप केले गेले आहेत," अशी माहिती भारतीय डाकच्या मुंबई क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे यांनी दिली. (हे ही वाचा: Aadhaar Card Update: आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदलणे आणखी सोपे झाले, पोस्टमन घरी येऊन करणार अपडेट)

अॅपमध्ये जर पत्ता सापडला नाही तर नवीन पत्ता टाकण्याचा पर्याय अॅप देतो. या अॅपमध्ये एक लिंक दिली आहे ज्यावर क्लिक करून नागरिक त्यांच्या पत्त्याचा तपशील टाकू शकतात. तसंच पोस्ट विभागाकडून त्यांचा पत्ता 24 तासात उपडेट करण्यात येईल असेही पांडे म्हणाल्या.