JioMart (संग्रहित संपादित प्रतिमा)

लॉक डाऊन (Lockdown) दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (Reliance Industries Ltd) आपले ऑनलाइन किराणा खरेदी (Online Grocery Service) पोर्टल, जिओमार्ट (JioMart) सुरू केले. सुरुवातीला मुंबईच्या (Mumbai) जवळपास 3 ठिकाणी जिओमार्टची चाचणी सुरू करण्यात आली होती. मात्र आता संपूर्ण भारतभर ही सेवा सुरु झाली आहे. रिलायन्स रिटेलच्या किराणा व्यवसायाच्या सीईओने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. आता जिओमार्ट देशातील 200 पेक्षा जास्त शहरांमध्ये सेवा देत आहे. महत्वाचे म्हणजे कंपनी उत्पादनाच्या एमआरपीवर 5% सवलत देत आहे. केपीएमजीच्या अंदाजानुसार 2027 पर्यंत देशातील ई-कॉमर्स मार्केट 200 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकेल.

दामोदर मॉल ट्वीट -

फेसबुकच्या मालकीच्या कंपनी व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) माध्यमातून, जिओमार्ट वर तुम्ही शॉपिंग करू शकता. सध्या व्हॉट्सअॅपचे देशात सुमारे 400 दशलक्ष वापरकर्ते आहेत. याबाबत फेसबुकने म्हटले आहे की, जिओमार्टबरोबरची भागीदारी व्हाट्सएपला छोट्या छोट्या व्यवसायांशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण साधन बनण्यास मदत करेल, अशी आशा आहे. फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्ममधील 9.99 टक्के भागभांडवल, 5.7 अब्ज म्हणजेच 43,574 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. या करारानंतर जिओ प्लॅटफॉर्म, रिलायन्स रिटेल आणि व्हॉट्सअ‍ॅपनेही व्यापार भागीदारीचा करार केला. अशा प्रकारे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जिओमार्टने आपली सेवा देण्यास सुरुवात केली.

जिओमार्ट देशभरातील 200 पेक्षा जास्त शहरांमध्ये किराणा सामान वितरित करेल, अशी माहिती भारतातील किराणा किरकोळ कंपनीचे मुख्य कार्यकारी दामोदर मॉल यांनी शनिवारी रात्री उशिरा ट्विटरवर दिली. खरेदीसाठी जिओ मार्टने एक व्हॉट्सअ‍ॅप नंबरही जारी केला आहे. आपण 8850008000 वर कॉल करून किराणा सामान घरी मागवू शकता. ही सेवा सुरू करण्यापूर्वी कंपनीने नवी मुंबई, कल्याण आणि ठाण्यातील बर्‍याच भागात 6 महिन्यांपासून त्याची चाचणी घेण्यास सुरवात केली होती. त्यानंतर आता कंपनीने 'जिओमार्ट'ची सेवा सध्या मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता यासारख्या शहरांमध्ये सुरु केली. (हेही वाचा: JioMart ने व्हॉट्सअ‍ॅपवर सुरु केली Online Shopping ची चाचणी; नवी मुंबई, ठाणे व कल्याण येथे सुविधा उपलब्ध, जाणून घ्या कशी द्यावी ऑर्डर)

सध्या 5 टक्के सवलत यासह, जर एखादा ग्राहक 750 रुपयांपेक्षा जास्त वस्तूंची ऑर्डर देत असेल, तर कंपनी त्यासाठी डिलिव्हरी शुल्क आकारणार नाही. कंपनी ग्राहकांकडून प्रत्येक ऑर्डरवर 25 रुपये डिलिव्हरी शुल्क आकारेल. याठिकाणी खरेदीसाठी ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करू शकतो.