Jio Tariff Rates: एअरटेल आणि व्होडाफोननंतर जिओनेही वाढवल्या प्लॅन्सच्या किंमती; 1 डिसेंबर 2021 पासून नवे दर लागू
Reliance Jio | (File Photo)

वापरकर्त्यांना परवडतील, त्यांच्या किंमती कमी असतील तसेच त्यापासून जास्त फायदे मिळतील असे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स ऑफर करण्याचा टेलिकॉम कंपन्यांचा (Telecom Companies) नेहमीच प्रयत्न असतो. नुकतेच एअरटेल आणि व्होडाफोनने त्यांच्या प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर आता जिओनेही (Jio) त्यांच्या सध्याच्या प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. कंपनीच्या नवीन योजना 1 डिसेंबर 2021 पासून लागू होतील. कंपनीचा सर्वात लोकप्रिय 555 रुपयांचा प्लॅन आता 666 रुपयांचा झाला आहे, तर 599 रुपयांचा प्लॅन आता 719 रुपयांचा झाला आहे. या दोन्ही प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांसाठी पूर्वीसारखीच राहील. याशिवाय जिओने आपल्या सर्व प्लॅनचे दर सुधारित केले आहेत.

जिओचा 75 रुपयांचा प्लॅन आता 91 रुपयांचा झाला आहे, ज्यामध्ये 29 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दरमहा 3GB डेटासह अमर्यादित व्हॉईस आणि 50 SMS देखील उपलब्ध आहेत. आधी 129 रुपयांचा प्लान खरेदी करण्यासाठी तुम्हाला 155 रुपये द्यावे लागतील. यामध्ये दरमहा 2GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 300 SMS मिळतात. त्याचप्रमाणे, तुम्हाला 149 रुपयांच्या प्लॅनसाठी 179 रुपये द्यावे लागतील, जे 24 दिवसांच्या वैधतेसह प्रतिदिन 1 GB डेटा, अमर्यादित कॉल आणि 100 SMS प्रतिदिन देईल.

199 रुपयांच्या रिचार्जसाठी आता तुम्हाला 239 रुपये द्यावे लागतील. यामध्ये दररोज 1.5 GB डेटा, अमर्यादित व्हॉइस आणि 100 SMS प्रतिदिन उपलब्ध आहेत. 249 रुपयांचे फायदे आता 299 रुपयांना मिळतील. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस आणि 100 एसएमएस प्रतिदिन उपलब्ध आहेत. 399 रुपयांची 56 दिवसांची वैधता असलेला प्लॅन आता 479 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये दररोज 1.5 GB डेटा, अमर्यादित व्हॉइस आणि 100 SMS प्रतिदिन उपलब्ध आहेत.

56 दिवसांची वैधता असलेला 444 रुपयांचा प्लॅन आता 533 रुपयांना मिळेल. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस आणि 100 एसएमएस प्रतिदिन उपलब्ध आहेत. 84 दिवसांची वैधता असलेला 329 रुपयांचा प्लॅन आता 395   रुपयांचा झाला आहे. यामध्ये एकूण 6 जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस आणि एकूण 1000 एसएमएस उपलब्ध आहेत. 84 दिवसांची वैधता असलेला 555 रुपयांचा प्लॅन आता 666 रुपयांचा झाला आहे, ज्यामध्ये दररोज 1.5 जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस आणि 100 एसएमएस दररोज उपलब्ध आहेत. 599 रुपयांची 84 दिवसांची वैधता असलेला प्लॅन आता 719 रुपयांचा झाला आहे. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस आणि 100 एसएमएस प्रतिदिन उपलब्ध आहेत.

1299 रुपयांमध्ये 336 दिवस चालणारा प्लॅन आता 1559 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये एकूण 24 जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस आणि 3600 मेसेज मिळतील. 2399 रुपयांचा 365 दिवसांचा प्लॅन आता 2879 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस आणि 100 एसएमएस प्रतिदिन उपलब्ध आहेत. (हेही वाचा: WhatsApp वर Voice Call रेकॉर्ड करण्यासाठी 'या' सोप्प्या स्टेप्स फॉलो करा)

जिओचा डेटा अॅड-ऑन योजनाही महाग झाल्या आहेत. 51 रुपयांचा प्लॅन, आता 61 रुपयांचा झाला आहे. यामध्ये 6 जीबी डेटा मिळणार आहे. 101 रुपयांचा प्लॅन, आता 121 रुपयांचा झाला आहे: यामध्ये 12 जीबी डेटा मिळणार आहे. 251 रुपयांचा प्लॅन आता 301 रुपयांचा झाला आहे: यामध्ये 50 जीबी डेटा मिळेल आणि 30 दिवसांची वैधता असेल.