iTel Vision 1 Pro बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च; पहा काय आहेत फिचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
itel Vision 1 Pro Launched (Photo Credits: Itel)

iTel Mobile ने नवा बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. Vision 1 Pro असे या फोनचे नाव असून हा गेल्या वर्षी झालेल्या itel Vision 1 चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. या स्मार्टफोनची किंमत 6599 रुपये इतकी आहे. हा मोबाईल  Micromax In 1B आणि Lava Z2 यांना चांगली टक्कर देणार आहे. नव्याने लॉन्च झालेला हा स्मार्टफोन- Aurora Blue आणि Ocean Blue या दोन रंगात उपलब्ध आहे. लॉन्च ऑफर अंतर्गत mono BT headset देण्यात येत आहे. हा स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्टवरुन (Flipkart) खरेदी करु शकता.

या स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा IPS LCD panel वॉटरड्राप नॉच सह देण्यात आला असून यात 720 x 1600 पिक्सलचे HD+ रिजोल्यूशन देण्यात आले आहे. याचा स्क्रीन टू बॉडी रेश्यो 90 टक्के इतका आहे. या फोनमध्ये 1.4GHz Cortex-A53  quad-core प्रोसेसर देण्यात आला असून 2 GB+32GB स्टोरेज देण्यात आले आहे.

iTel Vision 1 Pro Launched (Photo Credits: Itel)
iTel Vision 1 Pro Launched (Photo Credits: Itel)

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपर रियल कॅमेरा मॉड्युल देण्यात आले आहे. यात 8MP चा प्रायमरी शूटर दोन VGA कॅमेऱ्यासोबत देण्यात आला आहे. 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. यात 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली असून 800 तासांचा बॅटरी बॅकअप, 35 तासांचा म्युझिक प्लेबॅक आणि 7 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक सपोर्ट असल्याचा कंपनीने दावा केला आहे. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 10 वर कार्यरत आहे.