Chandrayaan-3 Fourth Moon Orbit Maneuver: इस्रोचं मोठं यश! चंद्रापासून थोड्याच अंतरावर आहे आता चांद्रयान-3; केवळ 177 किमी अंतर बाकी
Chandrayaan-3 Fourth Moon Orbit Maneuver (PC - Twitter/ISRO)

Chandrayaan-3 Fourth Moon Orbit Maneuver: इस्रोने चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्राच्या चौथ्या कक्षेत आणले आहे. आता चांद्रयान 150 किमी x 177 किमीच्या जवळजवळ वर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. इस्रोने 14 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वादोन ते बाराच्या सुमारास चांद्रयान-3 चे थ्रस्टर्स चालू केले होते. इंजिन सुमारे 18 मिनिटे चालू होते. 5 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचले. त्यानंतर त्याची कक्षा दोनदा बदलण्यात आली आहे. या दिवशी चांद्रयानाने चंद्राची पहिली छायाचित्रे प्रसिद्ध केली. त्यावेळी चांद्रयान चंद्राभोवती 164 x 18074 KM च्या लंबवर्तुळाकार कक्षेत 1900 किमी प्रति सेकंद या वेगाने फिरत होते. जे 6 ऑगस्ट 2023 रोजी 170 x 4313 किमी कक्षेत कमी करण्यात आले. म्हणजेच ते चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत ठेवण्यात आले.

यानंतर 9 ऑगस्टला तिसर्‍यांदा कक्षा बदलण्यात आली. त्यानंतर ते चंद्राच्या पृष्ठभागापासून 174 किमी x 1437 किमीच्या कक्षेत फिरत होते. इस्रो चांद्रयान-3 चे इंजिन चंद्राच्या कक्षेत रेट्रोफिट करत आहे. 17 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. त्याच दिवशी, दोन्ही मॉड्यूल चंद्राभोवती 100 किमी x 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत असतील. लँडर मॉड्यूल 18 ऑगस्ट रोजी दुपारी 4.45 ते 4.00 या दरम्यान डि-ऑर्बिटिंग करेल. म्हणजेच त्याच्या कक्षेची उंची कमी होईल.

तथापी, 20 ऑगस्ट रोजी, चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल पहाटे 2.45 वाजता डी-ऑर्बिटिंग करेल. 23 ऑगस्ट रोजी लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. जर सर्व काही ठीक झाले तर लँडर साडेसहा वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.