भारतात (India) जगातील दुसरे सर्वात मोठे वायरलेस मार्केट (Wireless Market) आहे. जगभरातील विविध देशात 5G नेटवर्क उपलब्ध असून भारतात देखील लवकरच 5G नेटवर्क (Network) सुरू करणार असल्याची चर्चा सुरु होती. पण आता केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Central Minister Ashwini Vaishnav) यावर शिक्कामोर्तब केला आहे. 12 ऑक्टोबर पासून भारतात 5G सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असेल, अशी अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे. भारतीय यूजर्स 5G सर्विसच्या प्रतिक्षेत आहे. पण भारतीयांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार असुन आता भारतात 5G इंटरनेट सेवा वापरता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव (5G Spectrum Auction) पार पडत आहे. या लिलावात देशातील मोठमोठ्या टेलिकॉम कंपन्या (Telecom Company) सहभागी झालेल्या होत्या.
सध्या काही राज्यांच्या काही शहरांमध्ये 5G सर्विस (Service) सुरु करण्यात येत असली तरी येत्या दोन ते तीन वर्षांत 5G देशाच्या प्रत्येक भागात पोहोचावे अशी आमची अपेक्षा आहे, असही अश्विणी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी सागितलं आहे. तसेच सुरु करण्यात येणारी असलेली 5G सेवा किफायती दरात सुरु करण्यात येणार आहे. म्हणजे सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात 5G सेवा देण्यात येईल. तसेच फक्त शहरी (Urban) भागातच नाही तर ग्रामीण (Rural) भागात देखील 5G सर्विस पोहचवण्याचा आमचा मानस आहे, असं अश्विणी वैष्णव यांनी सांगितलं आहे. (हे ही वाचा:-iPhone 14 Launch Date: iPhone14 लॉन्चचा मुहूर्त ठरला, पुढील काही दिवसात आयफोन 14 बाजारात खरेदीसाठी उपलब्ध)
सध्या देशातील काही मुख्य शहरांमध्ये 5G सर्विस सुरु करण्यात येणार आहे.नंतर कालातराने या शहरांच्या संख्येत वाढ करण्यात येईल. 5G सेवा वेगाने सुरू करण्याची योजना आखण्यात येत आहे. दूरसंचार ऑपरेटर (Operator) त्या संदर्भात काम करत आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.