Infinix Hot 9 स्मार्टफोनचा उद्या दुपारी 12 वाजता Flipkart वर सेल, 5000mAh बॅटरी असलेल्या या फोनची 'ही' आहेत खास वैशिष्ट्ये
Infinix Hot 9 (Photo Credits: Twitter)

जबरदस्त कॅमेरा फिचर आणि बॅटरी लाईफ असलेला Infinix कंपनीचा नवीन स्मार्टफोन Infinix Hot 9 ची आज दुपारी 12 वाजता ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) सेल सुरु होणार आहे. या बजेट स्मार्टफोनची किंमत 9,499 रुपये इतकी आहे. 10,000 च्या आत किंमतीतील या स्मार्टफोनमध्ये आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवरुन हा स्मार्टफोन खरेदी करणा-या Axis Bank Credit Card और Axis Bank Buzz Credit Card धारकांना अतिरिक्त 5% डिस्काउंट देणार आहे. तसेच हा स्मार्टफोन 1056 रुपयाच्या महिना नो कॉस्ट EMI वर देखील खरेदी करु शकता.

या स्मार्टफोनच्या डिस्प्लेविषयी बोलायचे झाले तर यात 6.6 इंचाची HD+ डिस्प्ले देण्यात आली आहे. समुद्राच्या लाटांच्या रंगामधील फोन उपलब्ध करण्यात आला आहे. Infinix Hot 9 मध्ये MediaTek Helio P22 प्रोसेसर देण्यात आले आहे. त्यासोबतच यात 4GB रॅम आणि 64GB चे स्टोरेज देण्यात आले आहे. जे मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 256GB पर्यंत वाढवू शकतो.

हेदेखील वाचा- Infinix Note 7 स्मार्टफोन 16 सप्टेंबरला होणार लॉन्च, युजर्सला मिळू शकतात 'हे' दमदार फिचर्स

Infinix Hot 9 च्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर यात 13MP+2MP+ कमी लाइटचे सेंसर देण्यात आले आहे. त्यासोबत सेल्फीसाठी यात 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या बॅटरी विषयी सांगायचे झाले तर, यात 5000mAh ची Li-ion Polymer बॅटरी देण्यात आली आहे.

दरम्यान Infinix च्या Infinix Hot 9 Pro या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 6.6 इंचाचा एचडी+पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिजोल्यूशन 1600x720 इतके आहे. तर फोटोग्राफीसाठी यात क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48MP चा मेन कॅमेरा असून 2MP चा मॉक्रो लेन्स, 2MPचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसंच यात लो लाईट सेन्सर आणि ट्रिपल LED फ्लॅश आहे.