Infinix Note 7 स्मार्टफोन 16 सप्टेंबरला होणार लॉन्च, युजर्सला मिळू शकतात 'हे' दमदार फिचर्स
Infinix Note 7 (Photo Credits-Twitter)

Infinix यांनी त्यांचा लेटेस्ट स्मार्टफोन Infinix Note 7 चा व्हिडिओ टीझर जाहीर करत भारतात लॉन्चिंग करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. Infinix Note 7 स्मार्टफोन येत्या 16 सप्टेंबरला भारतीय बाजारात उतरवला जाणार आहे. टीझर व्हिडिओच्या माध्यमातून असा सुद्धा खुलासा करण्यात आला आहे की, Infinix Note 7 स्मार्टफोन विक्रीसाठी ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर उपलब्ध करुन दिला जाणार आहे. फिचर्स संबंधित बोलायचे झाल्यास स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, पंच होल डिस्प्ले आणि चार कॅमेरे दिले जाऊ शकतात.

Infinix Note 7 स्मार्टफोनच्या किंमती संबंधित अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु या स्मार्टफोनची किंमत 15-20 हजार रुपये असण्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, स्मार्टफोनची अधिकृत किंमत लॉन्चिंगच्या वेळीच कळू शकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Infinix Note 7 स्मार्टफोनमध्ये 6.95 इंचाचा एचडी+डिस्प्ले दिला जाऊ शकतो. याचा रेज्यॉल्यूशन 720X640 पिक्सल असण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G70 प्रोसेसर सपोर्ट दिला जाऊ शकतो. त्याचसोबत स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10 वर आधारित XOS 6.0 वर काम करणार आहे.(नोकिया प्रेमींसाठी खुशखबर! 5 कॅमेरे असलेला Nokia 5.3 स्मार्टफोन आजपासून Amazon आणि कंपनीच्या अधिकृत साइटवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध)

युजर्सला Infinix Note 7 स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या सेटअपमध्ये 48MP चा प्रायमरी सेंसर,2MP ची लेंस, 2MP चा मॅक्रो लेंस आणि लो-लाइट व्हिडिओ सेंसर दिला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त फोनच्या फ्रंटला 16MP सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Infinix ने Infinix Note 9 Pro स्मार्टफोन मे महिन्यात लॉन्च केला होता. या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंटची  किंमत 10,499 रुपये आहे. यामध्ये 6.6 इंचाचा एचडी+ पंच होल डिस्प्ले दिला आहे. याचा रेजॉल्युशन 720X1600 पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio P22 चिपसेट दिली आहे. तसेच स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10OS वर काम करणार आहे. हा स्मार्टफोन एकच वेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. परंतु युजर्सला मायक्रोएसडीच्या सहाय्याने 256GB पर्यंत वाढवता येणार आहे. कॅमेरा बद्दल बोलायचे झाल्यास Infinix Note Pro 9 स्मार्टफोनमध्ये 48MP चा प्रायमरी सेंसर, 2MP चा डेप्थ सेंसर, 2MP चा मॅक्रो लेंस आणि एक लो लाइट सेंसर दिला आहे.