Huawei P30 Lite ची प्री बुकिंग 10 मे पासून होणार सुरु;  2,200 रुपयांच्या कॅशबॅकसह मिळेल 2.2TB डेटा फ्री
Huawei, P30 Pro Series (Photo Credits: Twitter)

Huawei P30 Lite हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च झाला असून ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वर हा फोन उपलब्ध करण्यात आला होता. त्याचबरोबर ऑफलाईन देखील तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. आता या फोनची प्री बुकींग देखील सुरु झाली असून त्याअंतर्गत अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. Croma, Poorvika वर हा फोन उपलब्ध होईल. जाणून घ्या प्री बुकींग्सच्या ऑफर्स... (Huawei P30 Pro आणि P30 Lite भारतात लॉन्च; पहा काय आहेत फिचर्स आणि किंमत)

Huawei P30 Lite स्मार्टफोनची किंमत आणि ऑफर्स

Huawei P30 Lite च्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,990 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 22,990 रुपये आहे. या फोनची प्री बुकींग 10 मे पासून सुरु झाली होईल आणि 17 मे पर्यंत तुम्ही हा फोन खरेदी करु शकता.

प्री बुकींग केल्यानंतर तुम्हाला काही विशेष ऑफर्स मिळतील. Huawei P30 Lite साठी युजर्सला 2000 रुपये बुकिंग अमाऊंट द्यावी लागेल. त्याचसोबतच युजर्सला 2,990 रुपये किंमतीचा Boat Rockerz 255 sports Bluetooth wireless earphones फ्री दिले जातील. त्याचबरोबर जिओ युजर्सला 2,200 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. हा कॅशबॅकमध्ये 50 रुपयांचे 44 व्हाऊचर्स दिले जातील. तसंच 2.2 टीबी टेडा देखील मिळेल.

Huawei P30 Lite चे फिचर्स

यात 6.15 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिला असून मायक्रो एसडी कार्डसह तुम्ही स्टोरेज क्षमता वाढवू शकता. हा फोन अॅनरॉईड 9 वर काम करतो. यात 3340 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हा फोन ब्लू, ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून याचा प्रायमरी सेंसर 24 मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड सेंसर आहे. तिसरा डेप्थ सेंसर 2 मेगापिक्सलचा आहे. यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट सेंसर देखील आहे. या फोनच्या बेस वेरिएंटची किंमत 19,990 रुपये आहे. तर हाय एंड वेरिएंटची किंमत 22,990 रुपये आहे.