Huawei P30, P30 Pro (Photo Credits: Twitter)

चायनीज स्मार्टफोन कंपनी हुवावे (Huawei) ने भारतात लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन Huawei P30 Pro लॉन्च केला आहे. गेल्या महिन्यात हा फोन ग्लोबल मार्केटमध्ये सादर करण्यात आला होतो. हा स्मार्टफोन क्वॉड कॅमेरा सेटअप आणि फुल एचडी+ OLED डिस्प्लेसह लॉन्च करण्यात आला आहे. प्रिमियम फिचर्स असलेला हा स्मार्टफोन तुम्हाला ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनवरुन खरेदी करता येईल. या फोनची खासियत म्हणजे फोनचा कॅमेरा. या स्मार्टफोनमध्ये सर्वात अडवॉन्स कॅमेरा देण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्याचबरोबर कंपनीने P30 चे लाईट वेरिएंट असलेला Huawei P30 Lite हा स्मार्टफोन देखील लॉन्च केला आहे.

Huawei P30 Pro चे फिचर्स:

यात 40 मेगापिक्सल (f/1.8 aperture) प्राइमरी सेंसर असलेला कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच 20 मेगापिक्सल अल्ट्रा वाईल्ड ऐंगल सेंसर (f/2.2 aperture) आणि एक टेलिफोटो 8 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 5x पेरीस्कोप झूमचा पर्याय आहे. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. वॉटरड्रॉप नॉचसह येणारा Leica पावर्ड ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टम यात देण्यात आली आहे.

हुवावे P30 हे अॅडव्हान्स व्हर्जन आहे. Huawei P30 Pro मध्ये 6.47 इंचाचा कर्व्ड OLED फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिजोल्यूशन 1080x 2340 पिक्सल आहे. या फोनमध्ये 4,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात रिव्हर्स वायरलेस चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे. 26 एप्रिलपासून हा फोन खरेदीसाठी उपलब्ध होईल. तर क्रोमावर हा फोन मे पासून खरेदी करु शकाल.

Huawei P30 Lite चे फिचर्स:

Huawei P30 Lite मध्ये सिक्युरीटीसाठी फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर यात 3,340 एमएएच (MAH) ची बॅटरी देण्यात आली आहे. Huawei P30 Lite च्या 40 जीबी वेरिएंटची किंमत 19,990 रुपये आहे तर 6 जीबी वेरिएंटची किंमत 22,990 रुपये असेल. हा फोन मिडनाईट ब्लॅक, पीकॉक ब्लू आणि पर्ल व्हाईट कलरमध्ये उपलब्ध होईल.