'कॉल ड्रॉप' च्या समस्येपासून तुम्ही त्रस्त आहात? 'या' पद्धतीने करा तक्रार
call drops | (Archived and representative images)

सध्या डिजिटल युगात स्मार्टफोनचा वापर सर्वाधिक वाढला आहे.तसेच काही महत्वाची कामे स्मार्टफोनवरील एका अॅपमुळे पूर्ण होतात. परंतु जर तुम्हाला कॉल ड्रॉपची समस्या येत असल्यास काही सुचत नाही. दिवसातून दोन तीन वेळेस कॉल ड्रॉपची समस्या येतेच. त्यात देशात नेटवर्कच्या समस्येची अधिक भर पडत आहे. मात्र तुम्हाला होणाऱ्या या कॉल ड्रॉपच्या त्रासापासून दूर रहायचे असल्यास TRAI कडे यासंबंधित अनेक अॅप आहेत. तेथे तुम्हाला जाणवणाऱ्या समस्येचे निवारण करु शकता. ही समस्या स्मार्टफोन, टीव्ही किंवा केबलसंबंधित असू शकते. यासाठीतुम्हाला ट्रायने TRAI MyCall नावाचे अॅप उपलब्ध करुन दिले आहे.

TRAI MyCall हे क्राउड-सोर्स कॉल क्वालिटी मॉनिटरिंग अॅप आहे. याच्या सहाय्याने ग्राहक थेट ट्रायला व्हॉइस कॉल क्वॉलिटीसाठी तक्रार करु शकता. हा अॅप आयफोन आणि अँन्ड्रॉइ़ड स्मार्टफोनमधून डाऊनलोड करु शकता. त्याचसोबत या अॅपमध्ये पारदर्शक TPS डेटा पॉलिसी देण्यात येते. या ट्राय मायकॉल अॅपच्या माध्यमातून ग्राहक तक्रार नोंदवू शकतात.

ट्राय मायकॉल अॅपच्या माध्यमातून या पद्धतीने करा तक्रार:

-प्रथम My Call App चे नवीन वर्जन डाऊनलोड करा.

-अॅन्ड्रॉइ़ड युजर्स गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन TRAI MyCall अॅप डाऊनलोड करु शकतात.

-अॅप डाऊनलोड झाल्यानंतर Accpet ऑप्शन येतील त्यावर क्लिक करावे. यामध्ये मोबाईल क्रमांक, कॉल, हिस्ट्री, मेसेज आणि लोकेशन दिसणार आहे.

-त्यानंतर एखाद्या व्यक्तीला फोन करा किंवा तुम्हाला समोरुन फोन येण्याची वाट पहा.

-फोन आल्यास तो लगेच कट झाल्यास एक पॉप-अप विंडो तुम्हाला मोबाईलच्या स्क्रिनवर दाखवण्यात येईल. त्यामध्ये कॉलसाठी रेटिंग किती द्यायची हे दाखवले जाईल.

-तसेच जर तुम्हाला कॉल ड्रॉपची समस्या जाणवल्यास तेथे कॉल ड्रॉप ऑप्शनवर क्लिक करावे.

(WhatsApp वरील स्टेटस आणि फोटो 'या' सोप्या पद्धतीने करा सेव्ह)

 वरील सोप्या पद्धतीने तुम्हाला जाणवत असलेल्या कॉल ड्रॉपच्या समस्येची तक्रार ट्रायकडे करु शकता. तसेच ट्रायचे अॅप किंवा ऑनलाईनपद्धतीने सुद्धा तुमची तक्रार ट्रायकडे तुम्हाला करता येणार आहे.