WhatsApp वरील स्टेटस आणि फोटो 'या' सोप्या पद्धतीने करा सेव्ह
प्रातिनिधिक प्रतिमा (File Photo)

सोशल मीडियात चॅटिंगसाठी प्रसिद्ध असणारे मेसेजिंगमधील व्हॉट्सअॅप (WhatsApp) त्याच्या युजर्ससाठी प्रत्येकवेळी नवे नवे फिचर्स घेऊन येतात. तसेच बदलत्या ट्रेन्डनुसार व्हॉट्सअॅपमध्ये काही बदल केले जातात. सध्या व्हॉट्सअॅपवरील एखाद्या मित्राने स्टेटस किंवा फोटो पोस्ट केल्यास आपल्याला आवडतो. मात्र तो सेव्ह कसा करायचा हा प्रश्न पडतो. तर काहीजण फोटोचा स्क्रिन शॉट घेऊन तो आपल्या व्हॉट्सअॅपच्या स्टेटसला पोस्ट करतात.

मात्र व्हॉट्सअॅपवरील फोटो किंवा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वेगळा ऑप्शन देण्यात येत नाही. तसेच स्टेटसला ठेवलेला फोटो किंवा व्हिडिओ युजर्सला तो 24 तासानंतर पुन्हा दिसत नाही. यामुळे जर तुम्हाला ते सेव्ह करायचे असल्यास त्यासाठी एका सोप्या पद्धतींचा उपयोग करु शकता. मीडिया फाइल सेव्ह करण्यासाठी तुम्ही फाइल मॅनेजर अॅपच्या माध्यमातून एखाद्याच्या स्टेटसमधील व्हिडिओ किंवा फोटो सेव्ह करु शकता. 'या' सोप्या स्टेप्सच्या माध्यमातून ही तुम्ही स्टेटस सेव्ह करु शकता.

-प्रथम व्हॉट्सअॅप सुरु केल्यानंतर तुम्हाला हवे असलेले स्टेटस पहावे.

-स्टेटस पाहिल्यानंतर लोकल स्टोरेजमध्ये या फाइलची एक टॅम्पररी कॉपी तयार होईल.

-आता फाइल मॅनेजरमध्ये जाऊन ती फाइल शोधा.

-अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन शो हिडन फाइल्स ऑप्शन निवडा.

-त्यानंतर WhatsApp>Media>Status मध्ये जावे.

-येथे जे हवे ते स्टेटसवरील फोटो किंवा व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही फाइल्समध्ये सेव्ह करता येणार आहे.(खुशखबर! Whatsapp वापरण्यासाठी आता फोनची नाही लागणार गरज, लवकरच येणार Desktop Version)

सॅमसंग, एलजी, वनप्लस, ओप्पो आणि वीवो सारख्या स्मार्टफोनमध्ये फाइल मॅनेजर अॅप देण्यात आले आहेय तर काही स्मार्टफोनमध्ये हे अॅप डाऊनलोड करावे लागते. त्यामुळे वरील सोप्या ट्रिक्स वापरुन तुम्ही व्हॉट्सअॅपवरील फोटो किंवा व्हिडिओ सेव्ह करु शकता.