प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

लॉकडाउनच्या काळात वर्क फ्रॉम होम सुरु असल्याने एसी आणि विजेचा अधिक वापर केला जात आहे. परंतु ज्यावेळी तुम्ही एखाद्या कंपनीचा एसी खरेदी करता तेव्हा त्याची संपूर्ण माहिती करुन घेणे आवश्यक असते. जॉनसन कंट्रोल्स हिताची एअर कंडिशनिंग इंडिया लिमिटेडच्या बिझसेन प्लॅनिंग अॅन्ड मार्केटिंग डिव्हिजनचे वाइस प्रेसिडेंट नीलेश शाह यांनी काही टीप्स दिल्या आहेत. तर जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर(Yahoo Mobile सेवा बंद करण्याचा कंपनीचा निर्णय; 'या' तारखेनंतर घेता येणार नाही सेवेचा लाभ)

काही लोकांचे असे म्हणणे असते की, एसी तापमान जेवढे कमी ठेवू तेवढीच अधिक थंड हवा मिळते. मात्र हे पूर्णपणे योग्य नाही आहे. लवकरात लवकर रुम थंड होण्यासाठी तापमान काही वेळेस 18 अंश सेल्सिअस केले जाते. परंतु या तापमानावर रुम थंड करणे हा योग्य मार्ग नाही आहे. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिऐंसीनुसार एअर कंडिशनचे एकूण तापमान 24 डिग्री असणे ही योग्य बाब आहे. हे तामपमान व्यक्तीच्या शरीराला योग्य आणि आरामदायी असते. ऐवढेच नाही तर शोधनुसार, एसीचे वाढवले जाणारे प्रत्येक डिग्री तापमान जवळजवळ 6 टक्के वीजेची बचत सुद्धा करतो. त्यामुळे एसीचे तापमान 18 अंश सेल्सिअस ठेवण्यापेक्षा 24 अंश सेल्सिअस ठेवा.

तर 5 स्टार रेटिंग असणारा एसी तुमच्या रुमसाठी प्रभावशाली पद्धतीने थंड ठेवण्यास मदत करतो. वेगाने रुम थंड करण्यासह कमी विजेचा सुद्धा या एसीच्या माध्यमातून वापर केला जातो. त्याचसोबत जर तुमच्या एसीसाठी टाइमरची सुविधा दिली असेल तर त्याचा योग्य वापर करणे फायदेशीर ठरेल. कारण टाइमरनुसार एसी सुरु किंवा बंद होतो. ही सुविधा फक्त तुम्हाला झोपेच्या दरम्यानच नव्हे तर सामान्य गोष्टींच्या वेळी सुद्धा याचा वापर करता येऊ शकतो. या सुविधेची सवय तुम्हाला वीजेचे बिल कमी येण्यास मदत करु शकते.(तुमचा Email-Id किंवा मोबाईल क्रमांक डेटा लीक झालेल्या यादीत आहे? 'या' पद्धतीने तपासून पहा)

एसी सुरु ठेवत असाल तर तुमच्या घराचा दरवाजा आणि खिडक्या बंद करण्यास विसरु नका. कारण असे केल्यास रुममधील थंडावा कमी होत नाही. त्याचसोबत एसीवर अधिक भार सुद्धा पडत नाही. एसी कमी वेळात खुप थंडावा देईल आणि विजेचे बिल सुद्धा तुम्हाला कमी येईल. तर एसीची वेळोवेळी काळजी घेण्यास विसरु नका.