
ज्या वेळेस आपण फोनवर बोलतो त्यावेळी मोबाईलचे नेटवर्क काही वेळेस जाते. त्यामुळे एखाद्याशी महत्वाचे बोलणे अर्धवट राहून गेल्याने आपण चिंता व्यक्त करतो. परंतु तुम्हाला आता काही काळजी करण्याची गरज नाही. कारण यावर आता एक उपाय असून काही सोप्प्या ट्रिक्स वापरुन तुम्ही तोडगा काढू शकता. त्यामुळे तुमची कॉल क्वालिटी सुद्धा सुधारण्यास मदत होणार आहे. घरात राहून तुम्ही या गोष्टी करु शकता ते सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी लक्षात असणे जरुरीचे आहे. त्यासाठी मोबाईलचा स्पीकर आणि ईअरपीस स्वच्छ करा, फोनला लावलेले कव्हर काढून टाका. तसेच फोनची बॅटरी 25 टक्के अधिक असेल याकडे लक्षा द्या. असे करुन सुद्धा मोबाईलला सिग्नल मिळत नसल्यास मोबाईलवरुन एखाद्याशी बोलण्याची जागा बदला.
कॉल क्वालिटी सुधरवण्यासाठी खोलीचे दरवाजे खिडक्या खुल्या ठेवा. त्याचसोबत सिग्नल येत नसल्यास लक्षात ठेवा जागा बदला. तरीही सुद्धा समस्या आल्यास ग्राहकांसाठी एअरटेल कंपनीने Wifi कॉलिंग सुविधा सुरु केली आहे त्याची निवड तुम्ही करु शकता. ही वायफाय सुविधा अॅक्टिव्ह करण्यासाठी प्रथम तुम्ही तुमचा Wifi प्रोव्हायडर वायफाय कॉलिंगची सुविधा देतो की नाही हे विचारा. (Samsung Galaxy M31s स्मार्टफोनमध्ये युजर्सला मिळणार धमाकेदार फिचर्स; 19,499 रुपयांत खरेदी करता येणार)
ही सुविधा अॅक्टिव्ह करण्यासाठी तुमच्या फोनच्या सेटिंग या ऑप्शन मध्ये जाऊन मोबाईट डेटावर क्लिक करा. तेथे गेल्यावर प्रायमरी SIM किंवा eSIM यावर क्लिक केल्यानंतर WiFi कॉलिंवर क्लिक करा. असे केल्यानंतर Wifi कॉलिंग मोड सुरु करा. तर या पद्धतीने तुम्हाला एअरटेल कंपनीकडून देण्यात येणाऱ्या फीचरचा फायदा होणार आहे. तसेच कॉल क्वालिटीची चिंता करण्याऐवजी वायफाय कॉलिंगचा वापर केल्यास तुम्हाला कोणतीही समस्या येणार नाही.