Happy Holiday Season 2019: सर्च इंजिन गुगलने आज अॅनिमेटेड डूडलच्या माध्यमातून आपल्या युजर्सना नाताळ सुट्टीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने सोमवारी मध्यरात्री 'Happy Holidays 2019', अशा शब्दात शुभेच्छा देत गुगल डूडल सादर केले आहे. या डूडमध्ये गुगलने Google या शब्दातील 'O' या शब्दात अॅनिमेशन केले आहे. या 'O' मध्ये एक सुचीपर्णी झाडं दाखवल आहे. तसेच सांता एका गाडीत बसून आकाशाची सफर करताना दिसत आहे. तसेच यातील विशेष बाब म्हणजे जेव्हा आपण गुगल डूडलवर कर्सर घेऊन जातो, तेव्हा आपल्याला 'हॅपी हॉलिडेज 2019', असं लिहलेलं दिसतं. तुम्ही Google.com या संकेतस्थळावर जाऊन गुगने सादर केलेले हे खास डूडल पाहु शकता. गुगल नेहमी एखाद्या दिवसाच्या निमित्ताने गुगल डूडल सादर करत असते.
अमेरिका तसेच इतर देशांमध्ये नाताळाचा सण उत्साहात साजरा केला जातो. या दिवसांत तेथे सुट्टीचा हंगाम असतो. या दिवसांत ख्रिसमस, हनुक्का आणि क्वान्झा निमित्त सुट्टी असते. त्यामुळे पाश्चात्य देशात हा काळ सुट्टीचा आणि उत्सवाचा हंगाम असतो. म्हणून गुगलने खास डूडल सादर केले आहे. (हेही वाचा -Google तुमच्या 'या' गोष्टींवर ठेवतो करडी नजर, जाणून घ्या)
It’s the most
DeLIGHTful time
of the year 🎶
With these Holiday Doodles
and everyone telling you
to be of good cheer ✨
It’s the most
DeLIGHTful time
of the year 🤗#GoogleDoodle → https://t.co/aQAOf3gcm1 pic.twitter.com/6U6Dghx3gg
— Google Doodles (@GoogleDoodles) December 23, 2019
Happy Holiday Season 2019: गुगलने डूडलच्या माध्यमातून दिल्या नाताळ सुट्टीच्या शुभेच्छा Watch Video
22 डिसेंबरला गुगलने आपल्या युजर्सना नव्या ऋतुच्या शुभेच्छा दिल्या होत्या.22 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस असतो. या दिवसापासून उत्तरायणाला सुरुवात होते. या दिवशी सर्वात जास्त लहान दिलवस आणि रात्र मोठी असते. त्यामुळे Winter Solstice च्या माध्यमातून गुगलने डुडलने या दिवसाचे महत्व पटवून दिले होते.