
अमेरिकन टेक कंपनी गुगलने त्यांचे लोकेशन शेअरिंग अॅप Trusted Contacts हे गुगल प्ले स्टोर आणि अॅपल स्टोर येथून हटवले आहे. दरम्यान, युजर्सला या अॅपचा वापर येत्या 1 डिसेंबर पर्यंतच करता येणार आहे. तर कंपनीने त्यांचे आता लोकेशन शेअरिंग अॅप हे Google Maps सोबत कनेक्ट केले आहे. यापूर्वी गुगलने लॅटिट्युड आणि गुगल प्लस ही सेवा बंद केली होती.(Yahoo Groups to Shut Down: याहू युजर्ससाठी मोठी बातमी; 15 डिसेंबरपासून बंद होणार 'याहू ग्रुप' सेवा, जाणून घ्या कारण)
गुगलने युजर्सला ट्रेस्टड कॉन्टेक्ट्स अॅप बंद होणार असल्याची माहिती इ-मेलच्या द्वारे दिली आहे. कंपनीने त्यांच्या इ-मेल मध्ये असे म्हटले आहे की, गुगल मॅप्ससोबत लोकेशन शेअरिंग हे कनेक्टेड केले आहे. आता ट्रस्टेड कॉन्टक्स अॅपची गरज भासणार नाही आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, आपली सेवा आणि प्रोडक्ट्स अधिक उत्तम बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.गुगलने 2016 मध्ये Trusted Contacts अॅप लॉन्च केले होते. सुरुवातीला या अॅपला फक्त अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले होते. मात्र काही काळाने हे अॅपल युजर्ससाठी ही अॅप स्टोर मध्ये उपलब्ध केले होते.(Google आणि Apple ला टक्कर देण्यासाठी भारत लॉन्च करणार आपले App Store)
तर या महिन्याच्या सुरुवातीलाच गुगलने पिक्सल सीरिज मधील Google Pixel 5 हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. फिचर बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 6 इंचाचा एचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले दिला गेला आहे. याचा अॅस्पेक्ट रेश्यो 19:5:9 आहे. या उत्तम परफॉर्मेन्ससाठी तो Sanpdragon 765G प्रोसेसर, 8GB LPDDR4X रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येणार आहे. तसेच गुगल पिक्सल 5 हा लेटेस्ट अॅन्ड्रॉइड 11 आउट ऑफ द बॉक्स ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे.