Google Pay (Photo Credits-Twitter)

गुगल (Google) आपल्या पेमेंट अॅप Google Pay मध्ये सुधारणा करत आहे. अशातच आता माउंटेन व्यू च्या दिग्गज कंपनीने गुगल पे युजर्ससाठी फिक्स डिपॉजिट (Fixed Deposit) सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने एका लहान आर्थिक बँकेसोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता स्वतंत्रपणे बँकेत खाते सुरु करण्याऐवजी थेट गुगल पे अॅपच्या माध्यमातून एफडी सुरु करता येणार आहे.

गुगलने चेन्नईतील इक्विटास स्मॉल फायनान्स बँकसोबत भागीदारी केली आहे. त्यांच्या माध्यमातून नागरिकांना बँक खात्याशिवाय थेट एफडीचे बेनिफिट्स दिले जाणार आहेत. यासाठी इच्छुक युजर्सला आता गुगल पे वर एफडी सुरु करता येईल. यासाठी नागरिकांना वर्षभरासाठी 6.35 टक्के व्याज सुद्धा दिले जाणार आहे.(Elon Musk ची कंपनी SpaceX त्यांच्या पहिल्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज; 15 सप्टेंबर रोजी सुरु होणार मिशन 'Inspiration 4')

Equitas SFB यांचे असे म्हणणे आहे की, फिनटेक इंन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन सेतु द्वारे विकसित APIs चा लाभ घेत डिजिटल FD सर्विस सुरु करणार आहोत. आता गुगलसोबत पार्टनरशिप करत बँक गुगल पे च्या माध्यमातून देशभरात सर्विस देणार आहे.

आता गुगल पे वर एफडी बुक करण्यासाठी तुम्हाला बिझनेस अॅन्ड बिल्स (Business and Bills) सेक्शन अंतर्गत इक्विटास स्मॉल फायनान्स बँक सर्च करावे लागेल. त्यानंतर तुन्हाला KYC डिटेल्स द्यावे लागणार आहेत. तर गुगल पे च्या UPI चा वापर करुन तुमच्या FD साठी पेमेंट करावे लागेल.(WhatsApp ने लॉन्च केले Money Heist Animated Stickers; डाऊनलोड कसे कराल? वापरायचे कसे? इथे घ्या जाणून)

एफडी सुरु केल्यानंतर तुम्हाला थेट गुगल पे अॅपवर ती ट्रॅक करता येणार आहे. या व्यतिरिक्त जसे पेमेंट अॅपचा वापर करुन अधिक FD काढली तरीही ते ट्रॅकिंग पेजवर तुम्हाला दिसणार आहे. Equitas SFB ने एका विधानात असे म्हटले की, मॅच्युरिटी रक्कम आपोआप Google Pay वापरकर्त्यांच्या Google Pay लिंक केलेल्या बँक खात्यात जाईल. या व्यतिरिक्त ट्रँकिंग पेजवर तुम्ही वेळेपूर्वीच FD मोडण्यासाठी सुद्धा अर्ज करु शकता.