Google Meet ला मिळाले नवे अपडेट, आता मिटिंग होस्टला करता येणार 'हे' बदल
Google Meet (Photo Credits-Twitter)

गुगल मिट (Google Meet) कडून नवे फिचर अपडेट करण्यात आले आहे. त्यानुसार मिटिंग होस्टला अधिक उत्तम पद्धतीने कंट्रोल करता येणार आहे. यापूर्वी Google Meet च्या सर्व युजर्सला माइक आणि कॅमेऱ्याचे कंट्रोल दिले जात होते. त्यामुळे मीटिंगमध्ये काही वेळेस अडथळे सुद्धा येत होते. याच कारणास्तव कंपनीकडून होस्टला कॅमेरा आणि मायक्रोफोन ऑफ करण्याचे ऑप्शन दिले गेले आहे. म्हणजेच मीटिंगदरम्यान होस्ट सर्व युजर्सचा कॅमेरा किंवा मायक्रोफोन ऑफ करु शकतो.

गुगल सारखे फिचर हे आधीपासूनच Microsoft कडून त्यांच्या Microsoft Teams साठी दिले जात आहे. याच आधारावर गुगलकडून त्यांच्या Education Fundamentals आणि Education Plus च्या सर्व वर्कस्पेसच्या मीटिंग होस्टला अधिक कंट्रोल दिले जाणार आहेत. त्याचसोबत अन्य गुगल वर्कस्पेसमध्ये येणाऱ्या दिवसात या फिचरचे अपडेट मिळणार आहे. मीटिंग होस्टजवळ युजर्सचा कॅमेरा किंवा मायक्रोफोन ऑफ करण्याचा अधिकार असणार आहे. तसेच युजर्सला गरज असेल ते स्वत:ला Unmute करु शकतो. हे फिचर खासकरुन डेस्कटॉप ब्राउजरला मिळणार आहे. मात्र लवकरच iOS आणि अॅन्ड्रॉइड युजर्सला ही दिले जाऊ शकते.(PUBG चा नवा गेम New State 'या' दिवशी भारतात होणार लॉन्च)

दरम्यान, गुगल मीटचा मायक्रोफोन आणि कॅमेरा फिचर डिफॉल्टच्या आधारावर लॉक होणार आहेत. होस्ट या मीटिंगच्या वेळी ऑन करु शकतो. नुकत्याच गुगलकडून गुगल मीटमध्ये लाइव्ह स्पीच ट्रान्सलेशन कॅप्शन फिचर रोलआउट केले आहे. लाइव्ह कॅप्शन फिचर खासकरुन अशा युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे ज्यांना पाहण्याची किंवा दिसण्याची समस्या आहे.