Chrome Browser वरुन गुगल काही फिचर्स हटवण्याच्या तयारीत, हे आहे कारण
Google Chrome Browser (Photo Credits-Twitter)

गुगल ब्राउजर (Chrome Browser ) युजर्ससाठी उत्तमरित्या सुरु व्हावा यासाठी गुगल (Google) काम करत आहे. त्यासाठी गुगल आता ब्राउजवरुन काही फिचर्स हटवण्याच्या तयारीत आहे. सध्या क्रोममध्ये युजर्सला काही अॅडवान्स फिचर्स देण्यात आले आहेत. मात्र हे फिचर्स काढून टाकल्यानंतर युजर्समध्ये नाराजी सुद्धा व्यक्त केली जाऊ शकते. परंतु कंपनीचे असे म्हणणे आहे की, फिचर्स काढून टाकल्यानंतर ब्राउजिंग आणि युआई उत्तमरित्या काम करु शकते. तर जाणून घेऊया क्रोमचे कोणते फिचर्स आहेत आणि त्यामुळे तुमच्यावर काय परिणाम होणार आहे.

क्रोमचे सध्याचे वर्जन 76 युजर्सला कोणत्याही टॅब बार वर क्लिक केल्यास तुम्हाला विविध ऑप्शन दाखवले जातात. यामध्ये न्यू टॅब, ड्युप्लिकेट टॅब किंवा सुरु असलेला टॅब म्युट करण्याचे ऑप्शन दिले जाते. तर Teach Dows च्या रिपोर्टमध्ये असे सांगितले आहे की, ब्राउजरच्या लेटेस्ट वर्जन मध्ये हे फिचर्स हटवण्यात आले आहे. म्यूट, पिन किंवा कोणत्याही टॅबला रिलोड करणे किंवा ड्युप्लिकेट टॅब हे फिचर ठेवण्यात आले आहेत. परंतु अन्य फिचर्स हटवण्यात आले आहेत. हे फिचर्स हटवल्याने क्रोम ब्राउजर सुरळीत काम करु शकते असे सांगण्यात आले आहे.(इन्स्टाग्रामसाठी फेसबुक लवकरच लॉन्च करणार नवं मेसेजिंग अ‍ॅप)

लेटेस्ट क्रोम ब्राउजर डेव्हलपर बिल्डमध्ये रिडिझाइन मेन्यू युजर्सला मिळणार आहे. तसेच क्रोमचे नवे वर्जन जेव्हा आले होते त्यामध्ये युजर्सला एनकॉग्मिटो मोड मध्ये पब्लिशर्स पासुन सुद्धा आपली अॅक्टिव्हिटी लपण्याचे ऑप्शन देण्यात आले आहे. हे फिचर आता सर्व युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.