Google कडून Android App साठी Dark Mode ची चाचणी, जाणून घ्या खासियत
Representative Image (Photo: inquisitr)

दिग्गज टेक कंपनी गुगल आपल्या अॅन्ड्रॉइड सर्च अॅपसाठी डार्क मोडीची टेस्टिंग करत आहे. द वर्ज यांच्या रिपोर्ट्सनुसार, नवी शेड ही गेल्या महिन्यात डेस्कटॉपवर पिच-ब्लॅक डार्क मोडसारखी नाही आहे. तर मोबाईल अॅपमध्ये दिसून आले की, सामान्य डार्क ग्रे रंगाच्या तुलनेत गडद असून काळ्या रंगाचा सुद्धा त्यात इफ्टेक्ट दिसून येतो.(काय सांगता? देशातील YouTubers करत आहेत 6 अंकांमध्ये कमाई; GDP मध्ये 6800 कोटींचे योगदान)

रिपोर्टमध्ये असे म्हटले की, गुगलच्या मोबाईल अॅपमध्ये नवे डार्क मोड ओएलईडी डिस्प्लेसारख्या उपकरणांसाठी अधिक आकर्षक असू शकतो. जो बॅटरी लाइफची अधिक बचत करण्यास मदत करेल. ज्या लोकांना डार्क मोड पसंद आहे त्यांच्यासाठी हे खास ऑप्शन असणार आहे.

अॅन्ड्रॉइड पोलिस यांनी असे म्हटले की, नवी शेड गुगल प्ले स्टोअरमध्ये गुगलचे लेटेस्ट 13.8 बीटा उपलब्ध आहे. जे तुम्ही एपीके मिररच्या माध्यमातून मिळवू शकता. रिपोर्टमध्ये पुढे असे म्हटले की, गेल्या वर्षात डेस्कटॉपवर डार्क मोडची चाचणी केली जात होती. तेव्हा कंपनीने फेब्रुवारीत आपल्या डेस्कटॉप युजर्ससाठी गुगल सर्चसाठी डार्क मोड मोठ्या स्तरावर रोलआउट करण्याची पुष्टी केली होती. दरम्यान, युजर्सला अॅपच्या नव्या कलर शेडला आपल्या हिंमतीने एक्सेस करता येणार आहे. अधिकृतरित्या अधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी काही महिने लागू शकतात.(Mobile Subscriber: डिसेंबरमध्ये मोबाईल ग्राहकांची संख्या 12.8 करोडाने कमी, एकट्या Jio ने 12.9 करोड ग्राहक गमावले, Airtel आणि BSNL ग्राहक वाढले)

दरम्यान, गुगलकडून एक नवे फिचर हे गुगल चॅट स्पेसमध्ये रोलआउट केले आहे. या नव्या फिचरमध्ये स्पेस मॅनेजर सेटिंग, स्पेस गाइडलाइन्स आणि स्पेस डिस्क्रिप्शनचा समावेश आहे. गुगलने ब्लॉक पोस्टच्या माध्यमातून असे म्हटले की, हे फिचर रोलआउट करण्यामागील उद्देश असा आहे की, एखादा विषय आणि प्रोजेक्टवर उत्तम अनुभव उपलब्ध करणे आहे. अशा प्रकारचे फिचर व्हॉट्सअॅपवर सुद्धा दिले गेले आहेत.