Mobile Subscriber: डिसेंबरमध्ये मोबाईल ग्राहकांची संख्या 12.8 करोडाने कमी, एकट्या Jio ने 12.9 करोड ग्राहक गमावले, Airte आणि BSNL ग्राहक वाढले
Representational Image (Photo credits: Pixabay)

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या मते, डिसेंबर महिन्यात भारतात मोबाईल वापरकर्त्यांच्या (Mobile Users) संख्येत 1.28 कोटींची मोठी घट झाली आहे. डिसेंबर महिन्यात व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) व्यतिरिक्त रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) ग्राहकांच्या संख्येतही घट झाली आहे. मात्र, एअरटेलने नवीन ग्राहक जोडले आहेत. ट्रायच्या (TRAI) आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओने सुमारे 1.29 करोड वायरलेस ग्राहक गमावले आहेत. व्होडाफोन आयडिया ने डिसेंबर 2021 मध्ये 16.14 लाख मोबाईल ग्राहक गमावले, तर Airtel चे 4.75 लाख ग्राहक वाढले. घसरणीनंतर जिओच्या ग्राहकांची संख्या 41.57 कोटींवर आली आहे. व्होडाफोन आयडियाचे आता 26.55 कोटी ग्राहक शिल्लक आहेत. थोड्याश्या वाढीनंतर, एअरटेल वापरकर्त्यांची संख्या 35.57 करोड झाली आहे.

मोबाईल वापरकर्त्यांच्या बाबतीत डिसेंबर महिना भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलसाठीही चांगला होता. बीएसएनएलने डिसेंबरमध्ये 11 लाख नवीन वापरकर्ते जोडले. दूरसंचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, खासगी कंपन्यांनी यापूर्वी मोबाइलचे दर वाढवले ​​होते.

बीएसएनएलचा बाजारातील हिस्सा 9.90 टक्के आहे

वापरकर्त्यांनी बीएसएनएलची सेवा घेण्याचा निर्णय घेतला. मार्केट शेअरबद्दल बोलायचे तर, सध्या एकूण मोबाइल वापरकर्त्यांमध्ये जिओचा हिस्सा 36 टक्के, भारती एअरटेल 30.81 टक्के, व्होडाफोन आयडिया 23 टक्के, बीएसएनएल 9.90 टक्के आणि एमटीएनएल 0.28 टक्के आहे.

दूरसंचार तज्ञांनी असेही म्हटले आहे की जिओने मोठ्या प्रमाणात निष्क्रिय सदस्य काढून टाकले आहेत. त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. तथापि, यामुळे Jio चे VLR प्रमाण सुधारेल. हे सक्रिय वापरकर्त्यांचे प्रमाण आहे, ज्यामुळे कमाईची गणना अधिक चांगल्या प्रकारे केली जाते. (हे ही वाचा Realme 9 Pro 5G आणि Realme 9 Pro+ 5G आज होणार भारतात लाँच; 'अशी' पाहू शकता लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या संभाव्य किंमत)

यंदाही मोबाइलचे दर वाढण्याची शक्यता 

नोव्हेंबर 2021 मध्ये, Airtel, Jio आणि Vodafone Idea ने मोबाईलचे दर वाढवले ​​होते. वैयक्तिक रिचार्जची किंमत 25-40 टक्क्यांनी वाढली आहे. टेलिकॉम ऑपरेटरने हा निर्णय वापरकर्ता किंवा ARPU ची सरासरी कमाई वाढवण्यासाठी घेतला आहे. यंदाही मोबाइलच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ होईल, असे मानले जात आहे. सध्या, भारतीय दूरसंचार क्षेत्राचा सरासरी ARPU $2 आहे, जो प्रति वापरकर्ता $4 पर्यंत वाढवावा लागेल. दूरसंचार क्षेत्र 2G वरून 4G वर सरकत आहे हे आपल्याला माहीत आहे. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एपीआरयूमध्ये (APRU) वाढ करणे आवश्यक आहे.