भारतात युट्यूब (YouTube) क्रिएटर्सची संख्या सातत्याने वाढत आहे. अधिकाधिक क्रिएटर्स YouTube वर त्यांच्या कलेच्या प्रदर्शनेला करिअरमध्ये बदलण्यासाठी संधी शोधत आहेत. YouTube ने ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स या स्वतंत्र सल्लागार कंपनीचा एक अहवाल प्रकाशित केला आहे, जो दर्शवितो की YouTube चा क्रिएटर्स इकोसिस्टम प्रचंड आर्थिक मूल्य निर्माण करत आहे. YouTube सुमारे 6.84 लाख लोकांना पूर्णवेळ काम देत आहे. 2020 मध्ये, त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत 6,800 कोटी रुपयांहून अधिक योगदान दिले आहे.
सध्या, 1 लाखांहून अधिक सदस्य असलेल्या भारतातील युट्यूब चॅनेलची संख्या 40,000 पेक्षा जास्त आहे आणि त्यामध्ये वर्ष-दर-वर्ष (YoY) 45 टक्के वाढ नोंदवली आहे. यासह, YouTube क्रिएटर्स या प्लॅटफॉर्मवर उत्पन्नाच्या नवनवीन संधी मिळवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधात आहेत. प्लॅटफॉर्मवर चॅनेलचे मॉनेटाईझ करण्याचे 8 वेगवेगळे मार्ग आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 6 अंकांमध्ये कमाई करणाऱ्या चॅनेलची संख्या प्रत्येक वर्षी 60 टक्क्यांनी वाढत आहे.
फायनान्शिअल एक्स्प्रेसमधील एका अहवालानुसार, ते म्हणाले- 'जसे आमचे क्रिएटर्स आणि कलाकार जागतिक प्रेक्षकांना जोडणाऱ्या मीडिया कंपन्यांची पुढची पिढी तयार करत आहेत, अर्थव्यवस्थेच्या वाढीवर त्यांचा प्रभाव वाढतच जाईल. जे लोक नवीन कौशल्ये निर्माण करण्यासाठी, स्वतःच्या आवडी शोधण्यासाठी, आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि आपला व्यवसाय वाढवण्यासाठी YouTube कडे वळतात, अशा लाखो भारतीयांसाठी खुले, सर्वसमावेशक आणि जबाबदार व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या आमच्या ध्येयावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.
कमाईच्या व्यतिरिक्त, YouTube हे क्रिएटर्सना मोठ्या प्रमाणात प्रेक्षक मिळवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी मदत करते. हे व्यासपीठ ब्रॅंड कोलॅबरेशन, लाइव्ह प्रदर्शन, स्पॉन्सरशिप इत्यादीद्वारे उत्पन्नाचे नवीन मार्ग सुरु करत आहे.