Free Fire India Removed From Google Play Store: 'फ्री फायर इंडिया' गेम लॉन्च होणार नाही; गुगलने 'या' कारणामुळे प्ले स्टोअरवरून हटवला गेम
Free Fire India Game (PC - X/@Rang872)

Free Fire India Removed From Google Play Store: फ्री फायर इंडिया (Free Fire India Game) संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर गेमिंग करत असाल आणि फ्री फायर इंडिया गेम लॉन्च होण्याची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. गुगलने फ्री फायर इंडिया गेमबाबत एक मोठे पाऊल उचलले आहे. गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून फ्री फायर इंडिया गेम काढून टाकले आहे.

गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन, भारत सरकारने गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी फ्री फायर गेमवर बंदी घातली होती. बंदीनंतर, फ्री फायर प्रेमी या बॅटल रॉयल गेमच्या पुन्हा लाँचची आतुरतेने वाट पाहत होते. आता गुगलने प्ले स्टोअरवरून काढून टाकल्याने हा गेम आता लॉन्च होणार नाही. (हेही वाचा -PM Modi's Post On AI and India: पंतप्रधान नरेंद्र मोदींची एआय तंत्रज्ञानावर पोस्ट; म्हणाले, 'AI चा सकारात्मक परिणाम होतो')

फ्री फायर इंडिया आधी 5 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार होते. परंतु, डेव्हलपर्सनी त्याचे लॉन्च पुढे ढकलले. नंतर काही रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले होते की ते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लॉन्च केले जाईल. मात्र, तरीही ते लॉन्च झाले नाही. Google ने Play Store वरून फ्री फायर इंडिया काढून टाकले असले तरीही तुम्ही Garena चे Free Fire Max डाउनलोड करू शकता. (हेही वाचा - 122 YouTube-Based News Channels Blocked: डिसेंबर 2021 पासून 122 यूट्यूब न्यूज चॅनेल ब्लॉक; अनुराग ठाकूर यांची माहिती)

फ्री फायर इंडियाच्‍या लॉन्चची घोषणा Garena ने ऑगस्टमध्‍ये केली होती. त्यासाठीची तयारीही कंपनीने सुरू केली होती. लॉन्चसाठी, कंपनीने महेंद्रसिंग धोनी, सायना नेहवाल यांसारख्या अनेक भारतीय क्रीडापटूंसोबत ट्रेलर रिलीज केला होता. अनेक क्रीडा व्यक्तिमत्वांनीही या खेळाला प्रोत्साहन दिले. Garena ने फ्री फायर इंडियाचा ट्रेलर देखील रिलीज केला होता, त्यानंतर त्याच्या लॉन्चच्या अपेक्षाही वाढल्या होत्या.